Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची ही 4 भाकिते येत्या काही महिन्यांत ठरु शकतात खरी!

Baba Vanga: बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांच्या भाकितांची अनेकदा चर्चा होते.
Baba Vanga
Baba VangaDainik Gomantak
Published on
Updated on

Baba Vanga Upcoming Predictions: बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांच्या भाकितांची अनेकदा चर्चा होते. 2022 या वर्षासाठी केलेल्या भाकितांपैकी आतापर्यंत 2 भाकिते खरी ठरली आहेत. यानंतर आता लोकांना बाबा वेंगा यांनी 2023 बद्दल केलेल्या भविष्यवाणीबद्दल जाणून घ्यायचे आहे. चला तर मग अशाच काही भाकितांबद्दल जाणून घेऊया:-

बाबा वेंगाचे हे 2 भाकित यावर्षी खरे ठरले आहेत

2022 या वर्षासाठी बाबा वेंगा यांनी 6 भाकिते केली होती, त्यापैकी 2 आत्तापर्यंत खरी ठरली आहेत, त्यानंतर येत्या काळात इतर चार भाकितेही खरी ठरण्याची भीती लोकांना आहे. बाबा वेंगा यांनी 2022 मध्ये काही आशियाई देशांमध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) पूर येण्याची भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली आहे.

Baba Vanga
Baba Vanga: '...भारतातील दुष्काळापर्यंत', बाबा वेंगाची 5 भाकिते

दुसरीकडे, काही काळापूर्वी ऑस्ट्रेलियात पावसानंतर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, तर पाकिस्तानमध्येही (Pakistan) पुरामुळे परिस्थिती बिकट झाली होती. यादरम्यान 1000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याशिवाय बाबा वेंगा यांनी काही शहरांमध्ये पाणीटंचाई आणि दुष्काळाचीही भविष्यवाणी केली होती. अलीकडच्या काळात पोर्तुगालला पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले, तर इटलीमध्ये (Italy) दुष्काळाची स्थिती निर्माण झाली होती.

आता लोकांच्या नजरा या चार अंदाजांवर लागल्या आहेत.

2022 मध्ये बाबा वेंगा यांनी कोरोना विषाणूनंतर एका नवीन प्राणघातक विषाणूची भविष्यवाणी केली होती, ज्याचा प्रसार सायबेरियातून होऊ शकतो. दुष्काळासारखी परिस्थिती आणि आभासी वास्तवात वाढ होण्याची भविष्यवाणीही करण्यात आली होती.

Baba Vanga
Baba Vanga: सावधान भारतीयानों! येत्या 3 महिन्यात येऊ शकतं मोठं संकट

तसेच, बाबा वेंगा यांच्या भाकितांनुसार 2022 मध्ये भारतात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. बाबा वेंगा म्हणाल्या होत्या की, '2022 मध्ये जगातील देशांमध्ये तापमानात घट होईल आणि त्यामुळे टोळांचा हल्ला वाढेल, ज्याचा भारतावर खोल परिणाम होईल. भारतात या संकटामुळे उपासमारीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com