America: अंत्यसंस्काराच्या वेळी स्मशानभूमीतच झाडल्या गोळ्या, अनेकजण जखमी

अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यात अंत्यसंस्काराच्या वेळी एका शूटरने गोळीबार केला, ज्यात अनेक लोक जखमी झाले आहेत.
America Graceland Cemetery
America Graceland Cemetery Dainik Gomantak

अमेरिकेत (America) पुन्हा एकदा गोळीबाराचे प्रकरण समोर आले. गुरुवारी, अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यात अंत्यसंस्काराच्या वेळी एका शूटरने अनेकांवर गोळीबार केला, ज्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, रेसीन पोलिस विभागाने ट्विटरवर ट्विट करत सांगितले की, दुपारी 2:26 वाजता ग्रेसलँड स्मशानभूमीत (Graceland Cemetery) गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. (Funeral shooting at America Graceland Cemetery many injured)

America Graceland Cemetery
तुर्कीने भारताचा गहू का केला परत, काश्मीर मुद्यावरही ओकली गरळ

त्यात अनेक जण जखमी झाले. मात्र, जखमींचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नसून घटनाक्रम सुरूच आहे. यासोबतच या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचेही ट्विट करून सांगण्यात आले आहे. पोलिसांनी ट्विट करून लोकांना घटनास्थळाजवळ न जाण्याचे अवाहन केले आहे. त्याचवेळी अंत्यसंस्कारात पाच जण जखमी झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांवर स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत सतत उघडपणे गोळीबारप्रकरणे समोर येत आहेत. तुलसा, ओक्लाहोमा येथील हॉस्पिटल कॉम्प्लेक्समध्ये एका तरुणाने गोळीबार केल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. यासोबतच हल्लेखोरही त्यावेळी मारला गेला.

America Graceland Cemetery
भारतीय शिष्टमंडळ अफगाणिस्तानात दाखल, दौऱ्याचा नेमका उद्देश काय?

शाळेबाहेर दीक्षांत समारंभाच्या वेळी पार्किंगच्या वादातून एका तरुणाने गोळीबार केला, ज्यामध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. त्याचवेळी, काही दिवसांपूर्वी टेक्सासमध्ये एका विद्यार्थ्याने शाळेत घुसून आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांवर गोळीबार केला होता, ज्यामध्ये 21 निष्पाप विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. आणि या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com