भारतीय शिष्टमंडळ अफगाणिस्तानात दाखल, दौऱ्याचा नेमका उद्देश काय?

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर प्रथमच भारत सरकारचे शिष्टमंडळ काबूलला गेले आहे.
 Taliban
TalibanDainik Gomantak
Published on
Updated on

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर प्रथमच भारत सरकारचे शिष्टमंडळ काबूलला गेले आहे. खरं तर, अफगाणिस्तानमधील मानवतावादी मदत कार्याचा आढावा घेण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची एक टीम काबूलला गेली आहे. (For the first time since the Taliban took over Afghanistan an Indian government delegation visited Kabul)

 Taliban
Taliban In Afghanistan: तालिबान महिलांच्या हक्कांवर पुन्हा अंकुश

दरम्यान, ही टीम काबूलमध्ये सत्ताधारी तालिबानच्या वरिष्ठ सदस्यांना भेटेल आणि भारताकडून पाठवल्या जाणाऱ्या मदतीबाबत चर्चा करेल. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. निवेदनानुसार, मंत्रालयातील संयुक्त सचिव (PAI) यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांचे एक पथक अफगाणिस्तानला (Afghanistan) गेले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, ही टीम मानवतावादी सहाय्याशी संबंधित विविध आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींना भेटणार आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी भारतीय प्रकल्प राबविण्यात येत आहेत त्या ठिकाणांनाही भेट देईल.

 Taliban
तालिबाबानच्या कब्जातून अफगाणिस्तान निसटतोय, ISIS चा धोका वाढला

मंत्रालयाने पुढे सांगितले की, अफगाणिस्तानातील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन भारताने आतापर्यंत 20 हजार मेट्रिक टन गहू, 13 टन औषधी, कोरोनाविरोधी लसीचे 5 लाख डोस, हिवाळ्यात वापरलेले कपडे इत्यादी पाठवले आहेत. ही सामग्री काबूलमधील (Kabul) इंदिरा गांधी चिल्ड्रन्स हॉस्पिटल, WHO, WEP सारख्या UN एजन्सीकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

मंत्रालयाने सांगितले की, भारताच्या (India) विकास आणि मानवतावादी सहाय्याचे अफगाण समाजाच्या संपूर्ण स्पेक्ट्रमने मोठ्या प्रमाणावर कौतुक केले आहे. भारतीय शिष्टमंडळ तालिबानच्या वरिष्ठ सदस्यांना भेटेल आणि अफगाणिस्तानातील लोकांना भारताच्या मानवतावादी मदतीबाबत चर्चा करेल. अफगाण लोकांशी भारताचे ऐतिहासिक आणि सभ्य संबंध आहेत.

 Taliban
अफगाणिस्तान पुन्हा हादरले, काबूलमध्ये मोठा स्फोट

भारताने अफगाणिस्तानमध्ये अनेक प्रकल्प राबवले आहेत

परराष्ट्र मंत्रालयाने पुढे सांगितले की, भारतीय शिष्टमंडळ तालिबानच्या वरिष्ठ सदस्यांना भेटेल आणि अफगाणिस्तानातील लोकांना भारतीय मानवतावादी मदतीबद्दल चर्चा करेल. विशेष म्हणजे, भारताने इराणला देशी कोवॅक्सीनचे 10 लाख डोस दिले होते, जेणेकरुन ते इथे आलेल्या अफगाण निर्वासितांना लसीकरण करु शकतील. भारताने अफगाणिस्तानमध्ये अनेक प्रकल्पांवर काम केले आहे. भारताने अफगाणिस्तानची संसद बांधली असून पश्चिम हेरात प्रांतात भारत-अफगाणिस्तान मैत्री धरणही बांधले आहे. यासह, नवी दिल्लीने देशातील 31 प्रांतांमध्ये 116 विकास प्रकल्पांवर काम केले आहे.

तालिबानने सुरक्षेचे आश्वासन दिले आहे

भारताने तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही. मात्र या सगळ्यानंतरही भारत अफगाण नागरिकांना मदत करत आहे. भारतीय शिष्टमंडळ कोणत्या तालिबानी नेत्यांना भेटणार आहे हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. याशिवाय भारतीय शिष्टमंडळ कुठे जाणार आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, तालिबान सरकारने भारतीय शिष्ट मंडळाच्या सुरक्षेची हमी दिल्याचे मानले जाते. त्यामुळे भारतीय शिष्टमंडळ अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्याचे अगोदर नियोजन करण्यात आले नसल्याचे या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com