VIDEO: "मला अल्लाहानचं पाठवलं!", गर्भवती महिलेसह 3 जणींवर माथेफिरुकडून जीवघेणा हल्ला; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Paris Knife Attack Port De Clichy: फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील पोर्ट डी क्लिची परिसर एका भयंकर आणि थरारक घटनेने हादरुन गेला.
Paris Knife Attack Port De Clichy
Paris Knife Attack Port De ClichyDainik Gomantak
Published on
Updated on

Paris Knife Attack Port De Clichy: फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील पोर्ट डी क्लिची परिसर एका भयंकर आणि थरारक घटनेने हादरुन गेला. एका माथेफिरुने दोन मोठ्या चाकूंनी तीन महिलांवर अचानक जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात 19, 24 आणि 36 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून, पीडितांमध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. फ्रान्सचे मंत्री लॉरेंट नुनेज यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिलांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. सोशल मीडियावर या थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात आरोपी हातात चाकू घेऊन महिलांवर तुटून पडताना स्पष्ट दिसत आहे, ज्यामुळे संपूर्ण शहरात दहशतीचे सावट पसरले.

हल्ल्याच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि सुट्टीवर असलेल्या एका धाडसी पोलीस अधिकाऱ्याने असीम धैर्य दाखवले. प्रत्यक्षदर्शी मोहामेद-अली बाउहाजर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला महिलांवर चाकूने वार करताना पाहताच त्यांनी मदतीसाठी हाक दिली. एका नागरिकाने तातडीने दाखवलेल्या प्रसंगावधानाने माथेफिरुवर एक मोठी सुटकेस फेकून मारली, ज्यामुळे त्याच्या हातातील दोन्ही चाकू खाली पडले. चाकू सुटताच उपस्थितांनी त्याला जमिनीवर पाडून बदडण्यास करण्यास सुरुवात केली.

Paris Knife Attack Port De Clichy
France Violence: नेपाळनंतर फ्रान्समध्ये 'अराजक'! नवा पंतप्रधान निवडताच उसळला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरु; 200 आंदोलकांना अटक VIDEO

त्याचवेळी, तेथून जाणाऱ्या सुट्टीवरील पोलीस अधिकाऱ्याने क्षणाचाही विलंब न लावता आरोपीला ताब्यात घेतले. मंत्र्यांनी या नागरिकांच्या आणि पोलीस अधिकाऱ्याच्या शौर्याचे तोंडभरुन कौतुक केले.

Paris Knife Attack Port De Clichy
France: इंग्लिश चॅनल ओलांडताना एका मुलासह पाच जणांचा मृत्यू; समुद्रकिनाऱ्यावर सापडले मृतदेह

जमावाने पकडल्यानंतर आरोपीने "मला अल्लाहने हे करायला पाठवले आहे" असा खळबळजनक दावा केला. मात्र, अटकेच्या वेळी आरोपी अत्यंत बहकलेल्या आणि मानसिकदृष्ट्या विचलित अवस्थेत बोलत होता, ज्यामुळे त्याची मूळ ओळख पटवणे कठीण झाले. या हल्ल्यामागील मुख्य उद्देश अद्याप अस्पष्ट असून, फ्रान्सच्या (France) राष्ट्रीय दहशतवादविरोधी अभियोजक कार्यालयाकडून या प्रकरणाचा दहशतवादी कोनातून तपास करायचा की नाही, याची पाहणी केली जात आहे. पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करत असून घटनेचे संपूर्ण सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com