World News: फ्रान्स 1988 मध्ये गर्भपाताच्या गोळ्यांना मान्यता देणारा पहिला देश ठरला होता. त्या पुढे जाऊन अमेरिकेने 2000 मध्ये गर्भपातास परवानगी दिली.
आता गर्भपाताच्या गोळ्यांनाही मान्यता दिली आहे. यानंतर आता जपाननेही गर्भपाताच्या गोळ्यांना मान्यता दिली आहे.
जपानच्या आरोग्य मंत्रालयाने प्रारंभिक अवस्थेतील गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी वापरल्या जाणार्या औषधाला मान्यता दिल्यानंतर प्रथमच गर्भपाताची गोळी जपानमध्ये उपलब्ध होईल.
दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी ओरल पिल, गर्भपात गोळीच्या विक्रीला मंजुरी दिली, ज्यामुळे गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात महिलांना शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध झाला.
जपानमध्ये (Japan) 22 आठवड्यांपर्यंत गर्भपात कायदेशीर आहे, परंतु गर्भपातासाठी जोडीदाराची संमती आवश्यक असते.
मंत्रालयाने शुक्रवारी आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या अधिसूचनेत सांगितले की, त्यांनी लाइनफार्माने बनवलेल्या गर्भपाताच्या औषधाला मान्यता दिली आहे.
ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनीने डिसेंबर 2021 मध्ये जपानमध्ये मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टॉलची विक्री करण्याची परवानगी मागितली होती.
राष्ट्रीय प्रसारक NHK ने सांगितले की, गर्भपाताचे औषध आणि वैद्यकीय सल्ल्याची फी सुमारे 100,000 येन (ã585) असेल. गर्भपात सार्वजनिक आरोग्य विम्यामध्ये समाविष्ट नाही.
गार्डियनने नोंदवले की, गर्भपाताचा खर्च 100,000 येन ते 200,000 येन दरम्यान असू शकतो. यासोबतच जपानमधील लोक अबॉर्शन पिलला प्राधान्य देतायेत. द गार्डियनच्या मते, जपानमध्ये डॉक्टरांच्या परवानगीशिवाय गर्भनिरोधक खरेदी करता येत नाही.
जपानी आरोग्य मंत्रालयाच्या फार्मास्युटिकल अफेयर्स आणि फूड सॅनिटेशन कौन्सिलच्या उपसमितीने ब्रिटनच्या (Britain) लाइनफार्मा इंटरनॅशनल लिमिटेड - मेफिगो पिल पॅकने विकसित केलेल्या गर्भपाताच्या गोळ्याला मंजुरी दिली होती, असे जपान टाइम्सने वृत्त दिले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.