'हा आहे चीनचा खरा नकाशा...'; माजी लष्करप्रमुखांनी घेतला ड्रॅगनच्या गैरकृत्यांचा समाचार

China: चीन आपल्या विस्तारवादी धोरणांसाठी बदनाम आहे. या धोरणाद्वारे चीनने आपल्या सीमेच्या आसपासच्या भागांवर कब्जा केला आहे.
China Map
China Map Dainik Gomantak

Former Army Chief General Manoj Naravane: चीन आपल्या विस्तारवादी धोरणांसाठी बदनाम आहे. या धोरणाद्वारे चीनने आपल्या सीमेच्या आसपासच्या भागांवर कब्जा केला आहे. चीनने काही वर्षांपूर्वी तिबेटचा ताबा घेतला आणि आता तैवानवरही त्याचा डोळा आहे.

चीन वेळोवेळी शेजारी देशांचे भाग आपल्या नकाशात दाखवतो. यातच आता, भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी ट्विट करुन चीनच्या या गैरकृत्यांचा समाचार घेतला आहे.

नरवणे यांनी त्यांच्या X (पूर्वीच्या ट्विटर) हँडलवर एक नकाशा शेअर केला आहे. फोटो शेअर करण्यासोबतच नरवणे यांनी लिहिले की, "अखेर कोणालातरी चीनचा खरा नकाशा सापडला."

माजी लष्करप्रमुखांनी ट्विट केलेला नकाशा पाहिला तर, हा रंगीत नकाशा तिबेटसह विविध भाग दाखवतो, ज्यावर चीन आपला दावा करतो. काही दिवसांपूर्वी, 28 ऑगस्ट रोजी चीनने आपल्या नकाशाची नवी आवृत्ती प्रसिद्ध केली.

ज्यामध्ये तैवान, दक्षिण चीन समुद्र, अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनचा चीनचा प्रदेश म्हणून समावेश करण्यात आला होता. चीन अधिकृत तुर्कमेनिस्तान, चीन (China) अधिकृत मंगोलिया आणि मंचूरियाचा काही भाग नकाशात दिसत आहे.

China Map
China Economic Crisis: सुपर पॉवर होण्याचे स्वप्न भंगणार! चीन अर्थव्यवस्थेला संकटांनी घेरले

दुसरीकडे, भारताने (India) अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनचा दावा करणाऱ्या चीनच्या तथाकथित नकाशावर आपत्ती व्यक्त केली होती. बीजिंगकडे यासंबंधी भारताने आपला निषेध नोंदवला होता. भारताने असेही म्हटले होते की, अशी पावले केवळ सीमाप्रश्न सोडवण्यात मदत करत नाहीत.

काही दिवसांपूर्वी, जपान, मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलीपिन्ससारख्या अनेक आसियान सदस्य देशांनीही चीनच्या क्षेत्रीय दाव्यावर आणि त्याने जारी केलेल्या नकाशावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.

China Map
China Economic Crisis: सुपर पॉवर होण्याचे स्वप्न भंगणार! चीन अर्थव्यवस्थेला संकटांनी घेरले

चीन तैवानवर कारवाई करणार का?

आपल्या विस्तारवादी धोरणांच्या अनुषंगाने, चीन अनेक दिवसांपासून तैवान सीमेवर सतत आपल्या प्राणघातक युद्धनौका आणि विमाने तैनात करत आहे.

तैवानने मंगळवारी पुन्हा एकदा सांगितले की, गेल्या 24 तासांत त्यांनी 22 चिनी लष्करी विमाने आणि 20 जहाजे त्यांच्या सीमेजवळ पाहिली आहेत. तैवानचा असा विश्वास आहे की, बीजिंगने या प्रदेशात आपल्या लष्करी हालचाली वाढवल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com