भारतानंतर आता अफगाणिस्तानचा पाकड्यांना मोठा दणका! तालिबानही रोखणार पाणी, कुनार नदीचा मुद्दा तापला; पाण्यासाठी होणार बेहाल!

Afghanistan To Build Dam on Kunar River: भारतानंतर आता अफगाणिस्तान देखील पाकिस्तानविरोधात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
Afghanistan To Build Dam on Kunar River
Kunar River
Published on
Updated on

Afghanistan To Build Dam on Kunar River: भारतानंतर आता अफगाणिस्तान देखील पाकिस्तानविरोधात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. अफगाणिस्तानने जर आपल्या नदीच्या पाण्याचा प्रवाह थांबवला, तर पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा खंडित होऊ शकतो. तालिबानने आता याच दिशेने पाऊल टाकले आहे.

तालिबानचे (Taliban) उपमाहिती मंत्री मुजाहिद फाराही यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानचे सर्वोच्च नेते शेख हिबतुल्लाह अखुंदजादा यांनी जल आणि ऊर्जा मंत्रालयाला कुनार नदीवर (Kunar River) धरण बांधण्याचे निर्देश दिले आहेत. कुनार नदी पाकिस्तानमधूनही वाहत असल्याने जर हे धरण बांधले गेले, तर पाकिस्तानात पाण्यासाठी हाहाकार माजू शकतो. काही दिवसांपूर्वी, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात सीमावर्ती भागावरुन मोठी चकमक झाली, ज्यात अनेक लोक मारले गेले. या संघर्षानंतर तालिबानने हा निर्णय घेतला आहे.

Afghanistan To Build Dam on Kunar River
Taliban Pakistan War: तालिबान आणि पाकिस्तानी सैन्यात चकमक, पाकचे 12 सैनिक ठार, अनेक चौक्या ताब्यात

पाण्याच्या संसाधनांवर अफगाणांचा अधिकार

मुजाहिद फाराही यांच्या मते, तालिबानच्या सर्वोच्च नेत्याने विदेशी कंपन्यांची वाट न पाहता, देशांतर्गत अफगाण कंपन्यांच्या मदतीनेच या प्रकल्पात पुढे जाण्याचे आदेश दिले आहेत. जल आणि ऊर्जा मंत्री मुल्ला अब्दुल लतीफ मन्सूर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, अफगाणिस्तानच्या लोकांना त्यांच्या जल संसाधनांवर व्यवस्थापनाचा पूर्ण अधिकार आहे.

पाकिस्तानसाठी दुहेरी झटका

दरम्यान, कुनार नदीवर धरण बांधण्याचा तालिबानचा निर्णय पाकिस्तानसाठी दुहेरी झटका आहे. कारण एका बाजूला भारताने (India) आधीच सिंधू नदी कराराला (Indus River Treaty) स्थगिती देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पाकिस्तान आता 'टू फ्रंट वॉटर वॉर' मध्ये अडकला आहे, असे म्हटले जात आहे. एकीकडे भारताचे कठोर धोरण आणि आता दुसरीकडे तालिबानही पाणीपुरवठा थांबवणार असल्याने पाकिस्तानची परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. लंडनस्थित अफगाण पत्रकार सामी युसूफझाई यांनी यावर प्रतिक्रिया दिली की, "भारतानंतर आता पाकिस्तानचा पाणीपुरवठा रोखण्याची पाळी अफगाणिस्तानची असू शकते."

Afghanistan To Build Dam on Kunar River
Taliban Punishment: अफगाणिस्तानात तालिबानच्या क्रूरतेचा कळस! महिलांसह 114 जणांना दिली 'क्रूर शिक्षा'; जगभरातून व्यक्त होतोय संताप

अफगाणिस्तानची जल संप्रभुता प्राथमिकता

2021 मध्ये सत्तेवर आल्यापासून तालिबानने अफगाणिस्तानच्या जल संप्रभुता (Water Sovereignty) ला प्राथमिकता दिली आहे. ऊर्जा उत्पादन, सिंचन आणि शेजारील देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तालिबानने आपल्या नदी प्रणालीचा वापर करण्याच्या उद्देशाने धरणे आणि जलविद्युत प्रकल्पांच्या योजनांना गती दिली आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये पाण्याचे वाटप करण्यासाठी कोणताही औपचारिक द्विपक्षीय करार (Bilateral Water-Sharing Agreement) नाही. त्यामुळे अफगाणिस्तान जल संप्रभुतेला महत्त्व देत असल्याने इस्लामाबादने यावर यापूर्वीच चिंता व्यक्त केली आहे.

Afghanistan To Build Dam on Kunar River
Taliban: हा जिहाद नाही... पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका, तालिबानने सोडली साथ; झाशात न अडकण्याचं पश्तूनांना केलं आवाहन

भारत-अफगाणिस्तान संबंधांचे महत्त्व

तालिबानने नदीवर धरण बांधण्याचा निर्णय अशा वेळी घेतला, जेव्हा दिल्लीमध्ये त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या (अमीर खान मुत्तकी) भेटीनंतर पाकिस्तानने काबूलवर हल्ला केला. मुत्तकी यांच्या दिल्ली दौऱ्यावेळी भारत-अफगाणिस्तान मैत्री धरण (सलमा धरण) चा संयुक्त निवेदनात उल्लेख करण्यात आला. सलमा धरण भारताच्या मदतीने 2016 मध्ये 30 कोटी डॉलर्सच्या खर्चातून बांधले गेले.

Afghanistan To Build Dam on Kunar River
Taliban: हा जिहाद नाही... पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका, तालिबानने सोडली साथ; झाशात न अडकण्याचं पश्तूनांना केलं आवाहन

कुनार नदी

कुनार नदीचा उगम हिमालयाच्या हिंदुकुश पर्वतरांगेत होतो. सुमारे 480 किलोमीटरचा प्रवास करुन ती पुढे काबुल नदीला मिळते. ही नदी अफगाणिस्तानातून पुढे पाकिस्तानात वाहत जाते. पाकिस्तानमध्ये कुनार नदीला 'चित्राल नदी' म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे या नदीवर धरण बांधल्यास त्याचा मोठा परिणाम पाकिस्तानवर होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com