Taliban: हा जिहाद नाही... पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका, तालिबानने सोडली साथ; झाशात न अडकण्याचं पश्तूनांना केलं आवाहन

Taliban Leader Zaeef On Pakistan: तालिबानने पाकड्यांची साथ सोडली. तालिबानचा वरिष्ठ नेता मुल्ला अब्दुल सलाम झैफ यांनी एक मोठे विधान करुन खळबळ उडवून दिली. झैफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक भडक पोस्ट केली.
Taliban Leader Zaeef On Pakistan
Taliban Leader Zaeef Dainik Gomantak
Published on
Updated on

भारताच्या धडक लष्करी कारवाईनंतर पाकड्यांचा जळफळाट झाला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून तब्बल 15 दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उडवून लावले. त्यानंतर पाकिस्तानने भ्याड हल्ले करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान, आता पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका बसला आहे. तालिबानने पाकड्यांची साथ सोडली. तालिबानचे वरिष्ठ नेते मुल्ला अब्दुल सलाम झैफ यांनी एक मोठे विधान करुन खळबळ उडवून दिली. झैफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक भडक पोस्ट केली. त्यांनी पश्तूनांना अवगत केले की, पाकिस्तानच्या 'जिहाद'च्या नावाखाली सुरु असलेल्या खेळात फसू नका.

झैफ यांनी स्पष्टपणे सांगितले की, ही लढाई जिहादसाठी नसून पाकिस्तानची (Pakistan) राजकीय खेळी आहे. त्यांनी पश्तूनांना आवाहन केले की त्यांनी त्यांच्या मुलांना पाकिस्तानच्या खोट्या जिहादपासून दूर ठेवावे. ते पुढे म्हणाले की, भारतासोबतच्या सध्याच्या संघर्षात पाकिस्तान तालिबानची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करु शकतो, परंतु अफगाण सैनिकांनी त्याचा भाग बनू नये.

Taliban Leader Zaeef On Pakistan
India Pakistan War: पाकिस्तानच्या ड्रोन, क्षेपणास्त्रांचा खात्मा! भारताकडून इस्लामाबाद, लाहोर, बहावलपूर येथे हल्ले

तालिबानचा सूर बदलला

तालिबान, जी बहुतेक पश्तूनांची संघटना आहे, तिचे पाकिस्तानशी जुने संबंध राहिले आहेत. एकेकाळी तालिबान आणि पाकिस्तान यांच्यात घनिष्ठ संबंध होते, पण आता तालिबानचा सूर बदलला आहे. झैफ यांचे विधान या बदललेल्या दृष्टिकोनाकडे निर्देशित करते. असे मानले जाते की, तालिबान आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षात 'मोहरा' बनू इच्छित नाही.

भारताची सर्जिकल स्ट्राईक

मंगळवारी (6 मे) रात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला, ज्यामध्ये 100 दहशतवादी मारले गेले तर 26 जण जखमी झाले. तेव्हापासून सीमेवरील तणावात वाढ झाली आहे. गुरुवार रात्रीपासून पाकिस्तान भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचे नापाक प्रयत्न करत आहे, परंतु भारताने त्याचे सगळे मनसुबे उद्ध्वस्त करण्यात यश मिळवले आहे.

Taliban Leader Zaeef On Pakistan
India Pakistan War: पाकिस्तानचा शेअर बाजार बंद, काश्‍मिरात नियंत्रण कक्ष, सौदीचे मंत्री अचानक भारतात; सीमारेषेवर घडामोडींना वेग

व्यापारावरही परिणाम, वाघा सीमेवर ट्रक अडकले

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा परिणाम अफगाणिस्तानच्या व्यापारावरही होत आहे. अहवालानुसार, अफगाणिस्तानातून भारतात (India) पाठवले जाणारे मालाने भरलेले कंटेनर वाघा सीमेवर अडकले आहेत. अफगाणिस्तान-पाकिस्तान जॉइंट चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रमुख नकीबुल्लाह सफी यांनी सांगितले की, सुकामेवा घेऊन येणारे आमचे अनेक ट्रक सीमेवर अडकले आहेत. जर दिर्घकाळ तणावाची परिस्थिती राहिली तर त्याचा व्यापारावर परिणाम होऊ शकतो.

दुसरीकडे, झैफ यांच्या विधानवरुन हे स्पष्ट होते की भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षापासून दूर राहून तालिबानला आपली स्थिरता आणि प्रादेशिक संतुलन राखायचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com