एखाद्या व्यक्तीच्या हवेमध्ये उडण्याच्या स्वप्नाबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल, पण आता कोणी तुम्हाला हवेत जाऊन हॉटेलमध्ये जेवायचे आहे असे सांगितले तर आश्चर्य वाटण्याची गरज नाहीये. लवकरच माणसाची ही इच्छा पूर्ण होईल. (Flying Hotel Plane)
होय, असे एक मोठे फ्लाइंग हॉटेल तयार करण्यात येत आहे, जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बसून खाण्याचा आनंद तर घेऊ शकता, यासोबतच जिम, स्विमिंग पूल सारख्या सुविधा देखील असणार आहेत. लवकरच तुम्हाला हवेत उडणारे हॉटेल देखील पाहायला मिळणार आहे. याची झलक सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्येही पाहायला मिळाली आहे.
हशेम अल-घैली नावाच्या यूट्यूब चॅनलने फ्लाइंग हॉटेल प्लेनचा कॉन्सेप्ट व्हिडिओ जारी करून सर्वांना या प्लेनबद्दल आश्चर्यचकित केले आहे. जे स्पेस स्टेशनच्या आजूबाजूच्या ढगांवरून उडताना दिसून येणार आहे. आणि यासोबतच आतील दृश्य पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाहीये.
जिम, स्विमिंग पूल यासह लक्झरी सुविधा असतील
व्हायरल व्हिडिओनुसार, भविष्यातील या उडत्या हॉटेलमध्ये एक प्रकारचे विमान असेल, जे कधीही जमिनीवर उतरणार नाहीये. ज्यामध्ये एकावेळी 5 हजार प्रवासी बसण्याची क्षमता असणार आहे. दुसरीकडे, फ्लाइंग हॉटेलमध्ये कोणत्याही पंचतारांकित हॉटेलप्रमाणेच रेस्टॉरंट्स, शॉपिंग मॉल्स तसेच जिम आणि स्विमिंग पूलसह सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत.
फ्लाइंग हॉटेल अनेक दिवस हवेत राहील
येमेनी सायन्स कम्युनिकेटरने त्याच्या 'स्लीक डिझाइन'बद्दल सांगितले की, हे फ्लाइंग हॉटेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने चालवण्यात येणार आहे. या फ्लाइंग जेट मध्ये 20 इंजिन असतील. ही सर्व इंजिने न्यूक्लियर फ्युजनच्या मदतीने चालवली जाणार आहेत.
त्यामुळे उडणाऱ्या हॉटेलला इंधन भरण्यासाठी कधीही उतरण्याची गरज भासणार नाहीये. व्हिडिओनुसार, हे उडणारे हॉटेल 24 तास सतत उड्डाण करेल आणि देखभाल-दुरुस्तीशी संबंधित सर्व कामे मध्य हवेतही केली जाणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.