Firing in Colorado: कोलोरॅडोच्या 'गे क्लब'मध्ये गोळीबार; 5 ठार, 18 जखमी

क्लबमध्ये पार्टी सुरू असतानाच गोळीबार झाला
Colorado
ColoradoDainik Gomantak

Firing at Colorado gay night club: कोलोरॅडो गे नाइटक्लबमध्ये गोळीबार झाला असून, यात पाच जणांचा मृत्यू झाला असून,18 जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री क्लब क्यू या नाइटक्लबमध्ये ही गोळीबाराची घटना घडली आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Colorado
Kumar Vishwas: कुमार विश्वास यांना जीवे मारण्याची धमकी, केजरीवाल यांच्या विरोधात न बोलण्याचा इशारा

कोलोरॅडो स्प्रिंग्स लेफ्टनंट पामेला कॅस्ट्रो येथे याबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली. क्लब क्यू या नाइटक्लबमध्ये झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहेत. तर, हल्ल्यानंतर एक संशयित ताब्यात घेण्यात आला आहे. अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोलोरॅडो येथील क्लब क्यू हा LGBTQ समुदायातील लोकांमध्ये खूप प्रसिद्ध क्लब आहे. गुगलवर देखील हा क्लब गे क्लब म्हणून लिस्ट आहे. या क्लबमध्ये ड्रॅग शो, डीजे आणि म्युझिकल पार्ट्या होतात, प्रामुख्याने गे समुदायातील लोक या क्लबमध्ये सहभागी होतात. दरम्यान, पार्टी सुरू असतानाच गोळीबार झाला आहे.

Colorado
IFFI Goa Opening Ceremony Pictures: इफ्फीचा भव्य उद्धाटन समारंभ, जगभरातील दिग्गज कलाकारांची उपस्थिती

क्लबने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर घडलेल्या घटनेबद्दल लोकांची माफी मागितली आहे. या हल्ल्यात आमचा क्लब उद्ध्वस्त झाल्याचे क्लबने म्हटले आहे. दरम्यान, धाडसी ग्राहकांचे आभार मानत त्यांच्या मदतीमुळे हल्लेखोराला पकडू पोलिसांनी त्याला अटक केली. असे त्यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com