पाकिस्तानात मंकीपॉक्स विषाणूचा प्रसार? 'पण...'

पाकिस्तानमध्ये (Pakistan) मंकीपॉक्स विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याच्या बातम्या येत आहेत.
Monkeypox Virus
Monkeypox Virus Dainik Gomantak

पाकिस्तानमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र सरकारने या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे. देशात मंकीपॉक्सची लागण झाल्याचे वृत्त सरकारने सोमवारी फेटाळून लावले. मात्र, सरकारने प्राण्यांपासून होणाऱ्या आणि विषाणूजन्य आजाराबाबत अधिक सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Monkeypox Virus
मंकीपॉक्स संसर्गाशी लढण्यासाठी भारत सज्ज

दरम्यान, 'रेडिओ पाकिस्तान' मधील एका अहवालात म्हटले आहे की राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सर्व राष्ट्रीय आणि प्रांतीय आरोग्य अधिकार्‍यांना मंकीपॉक्स संसर्गाच्या (Monkeypox Virus) प्रत्येक संशयित प्रकरणाबाबत अधिक सतर्क राहण्यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

वृत्तानुसार, 'अधिकाऱ्याने सांगितले की, ''पाकिस्तानमध्ये (Pakistan) मंकीपॉक्सच्या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर येत असलेल्या बातम्या चुकीच्या आहेत.' या आजाराचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. “आम्ही (Test) किट्स मागवले आहेत आणि ते लवकरच उपलब्ध होतील.”

Monkeypox Virus
युक्रेन मुद्यावर UN मध्ये भारत पाकिस्तान साथ-साथ

काँगो आणि नायजेरियामध्ये मृत्यू

आफ्रिकन देश काँगोमध्ये (Congo) मंकीपॉक्समुळे या वर्षी 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर नायजेरियात या आजारामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी काँगोच्या संकुरु आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. अमे अलोंगो यांनी सांगितले की, 'देशात मंकीपॉक्स विषाणूच्या 465 प्रकरणांची पुष्टी झाली आहे.' पश्चिम आणि मध्य आफ्रिकेला या विषाणूचा सर्वाधिक फटका बसला आहे. मृत माकडे आणि उंदीर खाल्ल्याने कांगोमध्ये हा आजार पसरत असल्याचे अलोंगो यांनी सांगितले.

रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवले जाते

अधिकारी पुढे म्हणाले की, 'येथील रहिवासी जंगलात प्रवेश करतात. मृत माकडे, वटवाघुळ आणि उंदीर हे मंकिपॉक्सचे स्त्रोत आहेत.'' ते म्हणाले की, 'मंकिपॉक्सची लक्षणे असलेल्या लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवले जाते. त्यांना आरोग्य केंद्रात जाण्याची विनंती करण्यात आली आहे.'

Monkeypox Virus
PAK vs SL| पाकिस्तान-श्रीलंका वनडे मालिका रद्द, कसोटी सामन्यांची मोठी माहिती उघड

दुसरीकडे, नायजेरियाच्या (Nigeria) रोग नियंत्रण एजन्सीने सांगितले की, ''देशात या वर्षी मंकिपॉक्समुळे मृत्यूची पहिली घटना घडली. 2022 मध्ये या आजाराची 66 संशयित प्रकरणे आढळून आली होती, त्यापैकी 21 मध्ये संसर्गाची पुष्टी झाली आहे.'' नायजेरियाच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (CDC) ने सांगितले की, '40 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्याला इतर आजारही होते.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com