
First legal same-sex marriage held in Nepal: समलिंगी विवाहाची नोंदणी करणारा नेपाळ हा दक्षिण आशियातील पहिला देश ठरला आहे. ब्लू डायमंड सोसायटी नावाच्या संस्थेचे अध्यक्ष संजीब गुरुंग (पिंकी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय ट्रान्सजेंडर माया गुरुंग आणि 27 वर्षीय समलैंगिक सुरेंद्र पांडे यांनी कायदेशीर विवाह केला आहे.
त्यांच्या लग्नाची नोंदणी पश्चिम नेपाळमधील लामजुंग जिल्ह्यातील दोर्डी ग्रामीण नगरपालिकेत करण्यात आली आहे. घरच्यांच्या संमतीने पारंपारिक पद्धतीने लग्न झालेले सुरेंद्र आणि माया गेल्या सहा वर्षांपासून पती-पत्नी म्हणून एकत्र राहत होते.
नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने पाच महिन्यांपूर्वी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिली होती.
केवळ नेपाळमध्येच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असून आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो, असे ब्लू डायमंड सोसायटीचे अध्यक्ष संजीब गुरुंग (पिंकी) म्हणाले.
ब्लू डायमंड सोसायटी ही संस्था नेपाळमधील ट्रान्सजेंडर्सचे हक्क आणि कल्याणासाठी काम करते.
पहिल्या समलिंगी विवाहाच्या नोंदणीबद्दल कळल्यावर खूप आनंद झाला. नेपाळमधील तृतीय लिंग समुदायासाठी ही मोठी गोष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.
मीडियाशी बोलताना माया म्हणाली की, हा तिच्यासाठी सेलिब्रेशनचा क्षण आहे. माया म्हणाली, आमच्या लग्नाची औपचारिक नोंदणी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आता आम्ही तो नाचून, पार्टी करून साजरा करत आहोत.
माया म्हणाली, सुरेंद्र आणि मी हा सोहळा एकत्र साजरा करण्यासाठी लमजुंगमधील दोर्डी येथे आहोत. आमच्या लग्नाची नोंदणी करण्याच्या निर्णयामुळे आम्हाला आमचा सन्मान झाल्यासारखे वाटत आहे.
2007 मध्येच नेपाळच्या (Nepal) सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला परवानगी दिली होती. 2015 मध्ये स्वीकारलेल्या नेपाळच्या राज्यघटनेतही लैंगिक अभिमुखतेच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाऊ शकत नाही असे स्पष्टपणे नमूद केले आहे.
27 जून 2023 रोजी, सर्वोच्च न्यायालयाने, गुरुंगसह अनेकांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर निर्णय देताना, नेपाळमध्ये समलिंगी विवाह कायदेशीर करण्याचा अंतरिम आदेश जारी केला होता.
परंतु समलिंगी विवाहांची (Same-Sex Marriage) तात्पुरती नोंदणी करण्याचा ऐतिहासिक आदेश असूनही, काठमांडू जिल्हा न्यायालयाने आवश्यक कायद्यांचा अभाव असल्याचे कारण देत चार महिन्यांपूर्वी हे पाऊल नाकारले. त्यावेळी सुरेंद्र पांडे आणि माया यांचा विवाह अर्ज फेटाळण्यात आला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.