FATF ने भारताचा म्युच्युअल असेसमेंट रिपोर्ट स्वीकारला; मनी लाँडरिंग विरोधातील कारवाईचे केले तोंडभरुन कौतुक!

Financial Action Task Force: एवढचं नाहीतर टेरर फंडिगविरोधात भारताने केलेल्या कारवाईचे तोंडभरुन कौतुक केले.
FATF ने भारताचा म्युच्युअल असेसमेंट रिपोर्ट स्वीकारला; मनी लाँडरिंग विरोधातील कारवाईचे केले तोंडभरुन कौतुक!
Financial Action Task ForceDainik Gomantak

फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्स (FATF) ने शुक्रवारी सिंगापूरमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत मनी लॉन्ड्रिंगवरील भारताचा म्युच्युअल असेसमेंट अहवाल स्वीकारला.

एवढचं नाहीतर टेरर फंडिगविरोधात भारताने केलेल्या कारवाईचे तोंडभरुन कौतुक केले. जागतिक संस्थेने म्हटले की, भारताने या दोन्ही क्षेत्रात चांगले काम केले आहे.

तथापि, FATF ने असेही म्हटले की, भारताने मनी लाँडरिंग आणि टेरर फंडिग प्रकरणांच्या सुनावणीसाठी होणारा विलंब दूर करणे आवश्यक आहे. 'गुणवत्ता आणि शाश्वतता पुनरावलोकन' पूर्ण झाल्यानंतर देशाचा अंतिम मूल्यांकन अहवाल प्रकाशित केला जाईल, असेही संस्थेने म्हटले.

'जागतिक वित्तीय बाजारपेठांमध्ये अधिक चांगला प्रवेश असेल'

"JAM (जन धन, आधार, मोबाईल) ट्रिनिटीची अंमलबजावणी तसेच रोख व्यवहारांवरील कठोर नियमांमुळे आर्थिक समावेशन आणि डिजिटल व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे," असे भारतीय वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले.

FATF चे मुख्यालय फ्रान्सच्या राजधानी पॅरिसमध्ये आहे

FATF चे मुख्यालय पॅरिसमध्ये (Paris) आहे. ही संघटना मनी लाँडरिंग आणि दहशतवादी फंडिगच्या विरोधातील जागतिक कारवाईचे नेतृत्व करते. आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी कायदे आणि धोरणे तयार करण्याची आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या संघटनेवर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com