Fact Check: गाझापट्टीतील स्थलांतरितांचा व्हायरल झालेला व्हिडिओ इस्रायल-हमास युद्धातील आहे का? जाणून घ्या

Fact Check: इस्रायल आणि हमास यांच्यात मागील दहा दिवसांपासून घनघोर युद्ध सुरु आहे, त्यामुळे गाझा पट्टीतून लोकांवर स्थलांतर करण्याची वेळ आली.
Fact Check
Fact CheckDainik Gomantak
Published on
Updated on

Fact Check: इस्रायल आणि हमास यांच्यात मागील दहा दिवसांपासून घनघोर युद्ध सुरु आहे, त्यामुळे गाझा पट्टीतून लोकांवर स्थलांतर करण्याची वेळ आली.

दरम्यान, एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लाखो लोक रस्त्यावरुन एका दिशेने जात आहेत. लोकांच्या हातात पिशव्या आणि काही वस्तू आहेत.

हा व्हिडिओ गाझा पट्टीतील असल्याचे सांगण्यात येत असून इस्रायलच्या हल्ल्यानंतर गाझामधून लोक अशा प्रकारे स्थलांतर करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, हा व्हिडिओ ना गाझाचा आहे ना अलीकडचा आहे.

या व्हिडिओचा गाझा-इस्रायल वादाशी काहीही संबंध नाही. तो अझरबैजानचा असून काही महिन्यांपूर्वीचा आहे. हा व्हिडिओ लष्करात भरती झालेल्या तरुणांच्या शपथविधी सोहळ्याशी संबंधित आहे.

अलीकडेच, एका व्हायरल व्हिडिओमध्ये इस्रायलच्या हल्ल्यांदरम्यान उत्तर गाझामधून दहा लाखांहून अधिक पॅलेस्टिनींनी पलायन केल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे, इस्रायलने (Israel) त्यांच्यासाठी खास रुट ठरवला आहे. या व्हिडिओवर युजर्स विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की, इस्रायलच्या भीतीने पॅलेस्टिनींनी गाझा सोडले.

दुसर्‍या युजरने लिहिले की, “गाझा सोडून जाणारा समुदाय जो अल्लाहशिवाय कोणाला घाबरत नाही.”

Fact Check
Israel Hamas War: इस्रायलने बॉम्ब हल्ले थांबवल्यास सर्व ओलिसांची सुटका करण्यास तयार, हमासचा प्रस्ताव

दरम्यान, या व्हिडिओची पुष्टी केली असता असे आढळून आले की, हा व्हिडिओ अलिकडचा नाही आणि गाझा-इस्रायल वादाशी त्याचा काहीही संबंध नाही. हा अझरबैजानमधील काही महिन्यांपूर्वीचा जुना व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ लष्करात भरती झालेल्या तरुणांच्या शपथविधी सोहळ्याशी संबंधित आहे.

व्हिडिओचे सत्य आले समोर?

व्हायरल व्हिडिओमध्ये ‘@rasim.2157’ नावाच्या TikTok अकाऊंटचा वॉटरमार्क दिसत आहे. भारतात TikTok वर बंदी आहे, म्हणून आम्ही या अकाऊंटबद्दल जाणून घेण्यासाठी Tor ब्राउझरची मदत घेतली. हा व्हिडिओ 13 ऑगस्ट 2023 रोजी या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये काही ठिकाणी अझरबैजानचे (Azerbaijan) झेंडे दिसत आहेत.

Fact Check
Israel Hamas War: गाझामध्ये संघर्ष सुरूच राहणार, UNSC ने रशियाचा युद्धविराम प्रस्ताव नाकारला

TikTok अकाऊंट ‘@rasim.2157’ वरील हा व्हिडिओ कीफ्रेमसाठी रिव्हर्स सर्च करणाऱ्या अझरबैजानच्या Baku TV आणि Sural TV या मीडिया संस्थांच्या YouTube चॅनेलवर दिसला होता. या दोन्ही संस्थांनी ऑगस्टमध्ये हा व्हिडिओ पोस्ट केला होता आणि व्हिडिओमध्ये दिसणारे लोक जवान सैनिकांचे पालक असल्याचे सांगितले होते.

तरुण सैनिकांच्या शपथविधी समारंभाला हे लोक आले होते, अशी माहितीही “बाकू टीव्ही” ने दिली होती. त्यावेळी या शपथविधी सोहळ्याच्या बातम्याही अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाल्या होत्या. गाझा पट्टीतील लोकांचा म्हणून अझरबैजानमधील जुना व्हिडिओ व्हायरल करण्यात आला, मात्र आता याची सत्यता समोर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com