Facebook ने पुन्हा एकदा 10,000 कर्मचाऱ्यांना दिल्ला डच्चू, नवीन नोकऱ्या शोधणाऱ्यांची झाली निराशा

Mark Zuckerberg: फेसबुकची मूळ कंपनी मेटाने 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
 Mark Zuckerberg
Mark ZuckerbergDainik Gomantak
Published on
Updated on

Facebook Layoff: फेसबुकची मूळ कंपनी मेटाने 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

यासोबतच 5000 नवीन लोकांना कामावर घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कंपनीने असे करण्यामागचे कारण म्हणजे मेटाला सातत्याने होत असलेले नुकसान असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, कंपनीने म्हटले आहे की, आम्ही एप्रिलच्या उत्तरार्धात टेक विभागात टाळेबंदीची घोषणा करणार आहोत. यास मे पर्यंत वेळ लागू शकतो.

टेक उद्योगाने 2022 च्या सुरुवातीपासून 280,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना (Employees) कामावरुन काढून टाकले आहे, त्यापैकी जवळजवळ 40% एकट्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये आहेत.

 Mark Zuckerberg
Mark Zuckerberg: बदनामी टाळण्यासाठी मार्क झुकरबर्गची कंपनी देणार 60 हजार कोटी! जाणून घ्या नेमकं प्रकरण

तसेच, मंगळवारी शेअर मार्केट सुरु झाल्यानंतर मेटाचे शेअर्स 6% वधारले होते. एक्झिक्युटिव्ह आउटप्लेसमेंट फर्म चॅलेंजर ग्रे अँड ख्रिसमसच्या म्हणण्यानुसार, टेक उद्योगाने एकूण 63,216 टाळेबंदी पाहिली, जी गेल्या वर्षी याच कालावधीत घोषित केलेल्या 187 टाळेबंदीच्या तुलनेत 33,705 टक्के जास्त आहे. या क्षेत्राने 2023 मध्ये सर्व नोकऱ्यांपैकी 35 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे.

 Mark Zuckerberg
Mark Zuckerberg यांनी पत्नीसह फोटो शेअर करत दिली खुशखबर, म्हणाले- पुढच्या वर्षी...

हा जानेवारी आणि फेब्रुवारीमधील कपातीचा आकडा आहे

यूएस मधील कंपन्यांनी फेब्रुवारीमध्ये 77,770 नोकऱ्या कमी केल्या आहेत, ज्या जानेवारीमध्ये 1,02,943 होत्या, तर आयटी कंपन्या टाळेबंदीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

आयटी कंपन्यांनी गेल्या महिन्यात 21,387 नोकऱ्या कमी केल्या आहेत, ज्या एकूण कपातीच्या 28 टक्के आहे. त्याचा परिणाम आता हळूहळू बाजारातही दिसून येत आहे.

गेल्या आठवड्यात सिलिकॉन व्हॅली बँकेच्या (Bank) दिवाळखोरीनंतर जगभरातील बाजारात घसरण झाली आहे. भारतीय बाजारपेठेतही प्रचंड नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com