अफगाणिस्तानात अडकलेल्या नागरिकांना भारतात घेऊन येण्यासाठी भारताला दररोज दोन विमानांचे उड्डाण करण्याची परवानगी नोटोने भारताला दिले असल्याची माहिती आज सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांनी दिली आहे. (India allowed to operate two flights daily to evacuate citizens from Kabul)
15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानची राजधानी तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कारवाया नियंत्रित करणाऱ्या अमेरिकन आणि उत्तर अटलांटिक करार संघटनेने (NATO) भारताला ही परवानगी दिली आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी सुमारे 150 भारतीयांना तालिबानने काबूल विमानतळाच्या गेटबाहेर पकडले आणि त्यांना ट्रकने दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले. मोठ्या चौकशीनंतर त्यांची सुटका करण्यात आली. अफगाणिस्तानातून 85 भारतीयांना हवाई दलाच्या विशेष विमानाने मायदेशी आणण्यात आले असुन उर्वरित भारतीयांनाही मायदेशी आणण्याची तयारी सुरू आहे.
तालिबानने पकडलेल्या सुमारे 150 भारतीयांचे अपहरण झाल्याचे वृत्त आज सकाळी आले होते, त्यानंतर या नागरिकांना सोडण्यात आले असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. आता ते सर्व नागरिकांना काबूल विमानतळावरु भारतात आणले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.