युक्रेनमध्ये रशियाविरोधात लढ्यासाठी मद्यधुंद महिलेनं बूक केली टॅक्सी; भाडे पाहून बँकर्स हैराण

लिओनीचा प्रियकर सैन्यात आहे, जर माझा प्रियकर युद्धात गेला तर मी देखील त्याच्या सोबत जाईल असे तिने तिच्या मित्रांना सांगितले
Taxi
Taxi Dainik Gomantak
Published on
Updated on

आजकाल ऑनलाइन टॅक्सी बुक करणे (Online taxi booking service) खूप सामान्य झाले आहे. उबेर, ओला सारख्या टॅक्सी सेवा जवळचे किंवा दूरचे लोक सहज वापरतात. पण तुम्ही कधी ऐकले आहे की एखादी व्यक्ती एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी कॅब बुक करत आहे. अलीकडेच इंग्लंडमधील एका महिलेने असेच काही केले. एका मद्यधुंद महिलेने इंग्लंडहून युक्रेनला जाण्यासाठी कॅब बूक करण्याचा प्रयत्न केला. तिला हे देखील माहित नव्हते की ती घरी जाण्याऐवजी युक्रेनला (Ukraine) जाण्यासाठी टॅक्सी बुक करत आहे. त्यातच टॅक्सीचे भाडे इतके महाग होते की, ते बघून बॅंक मॅनेजरलाही चक्कर आली.

Taxi
पुतीन जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती? 1,51,84,00,00,00,000 रुपयांची संपत्ती लपवण्यासाठी...

ग्रेट मँचेस्टरच्या वर्स्ले (Worsley, Great Manchester) येथे राहणारी 34 वर्षीय लिओनी फिल्डेस (Leoni Fildes) तिच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका बारमध्ये गेली होती. जिथे तिने तिच्या मित्रांसोबत भरपूर मद्यपान केले होते. मद्यधुंद अवस्थेत सर्वजण रशिया आणि युक्रेनच्या युद्धावर चर्चा करू लागले. हे पाहून रशियन (Russia) सैन्याविरुद्ध लढा आणि युक्रेनला मदत करण्याच्या निर्णयापर्यंत चर्चा गेली. डेली स्टारच्या वृत्तानुसार, त्या महिलेने दारूच्या नशेत युक्रेनला जाण्यासाठी कॅब बुक करण्यास सुरुवात केली.

लिओनीचा प्रियकर सैन्यात आहे, त्यामुळे तिने तिच्या मित्रांना सांगितले की, जर तिचा प्रियकर युद्धात गेला तर ती देखील त्याच्या सोबत जाईल. ही चर्चा इतकी गंभीर झाली होती की, घरी जाण्याऐवजी लिओनीने रशियन सैन्याशी लढण्यासाठी युक्रेनला जाण्याचा निर्णय घेतला. ती घरी जाण्यासाठी कॅब बुक करत होती पण ती वारंवार युक्रेनला जाण्यासाठी कॅब बुक करत होती. सलग 1 तास कॅब बुक न झाल्याने तिने दुसरी कॅब सेवा घेतली आणि रात्री उशिरा घरी पोहोचली, असे स्वत: महिलेने एका वेबसाइटशी बोलताना सांगितले.

Taxi
चेतावणी... G-7 च्या नेत्यांची पुतीन यांच्याविरोधात कठोर भूमिका

भाडे 4 लाखांपेक्षा जास्त होते

दुसऱ्या दिवशी तिला बँकेतून फोन आल्यावर या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य समजले. बँकर्सना हे जाणून घ्यायचे होते की लिओनी कुठल्या अडचणीत फसली आहे का? कारण कॅब बुकिंगचे शुल्क इतके जास्त होते की बँकवालेही हैराण झाले होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लिओनी इंग्लंड ते युक्रेन 2,723 रूपये देऊन कॅब बुक करत होती आणि तिचे भाडे 4 लाख रुपयांपेक्षा जास्त दाखवले जात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com