Twitter Employee Resigns: ट्विटर खरेदी केल्यापासून एलन मस्क (Elon Musk) यांनी कंपनीत अनेक बदल सुरू केले. अनेकांना नोकरीवरून काढून टाकले गेले आहे. नुकतेच मस्क जेव्हा कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेत होते तेव्हाही मस्क बोलत असताना त्यांच्या समोरच अनेक कर्मचारी राजीनामा देऊन निघून गेले.
एलन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना एक नवा अल्टीमेटम दिल्यानंतर या राजीनामासत्राची सुरवात झाली. हे सर्व कर्मचारी ठरवून आले होते. त्यामुळे त्यांनी जाणीवपुर्वक मस्क यांना सामुहिक राजीनामा देत धक्का दिला.
मस्क यांनी कर्मचाऱ्यांना हार्डकोर वर्क अल्टीमेटम दिला होता. त्यात गुगल फॉर्मच्या माध्यमातून काही प्रश्न विचारले गेले होते. त्यात विचारले होते की, कर्मचारी कंपनीच्या नव्या धोरणानुसार काम करण्यास राजी आहेत की नाही?, जर नसेल तर ते राजीनामा देऊ शकतात. त्यांना तीन महिन्यांचे वेतन दिले जाईल. अल्टीमेटमनुसार कर्मचाऱ्यांना अधिक काम करावे लागेल. आणि आपले काम उच्चतम पातळीवर आणि ठराविक तास केले पाहिजे, असे त्यात म्हटले होते.
त्यानंतर कंपनीच्या या पॉलिसीवर नाखुश असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. विशेष म्हणजे कंपनच्या बैठकीतच मस्क यांच्या समोरच राजीनामा देऊन अनेकजण निघून गेले. प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार या बैठकीत मस्क यांनी कंपनीला अधिक यशस्वी बनविण्यासाठी हार्डकोअर होण्याची गरज व्यक्त केली होती.
ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार या राजीनामा सत्रामुळे ट्विटरचे कामकाज मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे. तसेच कंपनीने ऑफिस बंद करण्याचाही निर्णय घेतला आहे.
44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर खरेदी केल्यापासून भारतातून 200 हून अधिक तर एकूण 3,500 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले. मस्क हे यावरून टीकेचे लक्ष्य ठरले आहेत. दरम्यान, न्यूयॉर्क टाईमच्या एका बातमीत म्हटले आहे की, कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात कर्मचारी सोडून गेल्याने आता ट्विटरचे काम प्रभावी पद्धतीने कसे चालू शकेल, याविषयी शंका व्यक्त होत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.