Britain मध्ये आली मंदी? अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सुनक सरकारची मोठी घोषणा

Rishi Sunak News: ब्रिटन आर्थिक आघाडीवर संघर्ष करत आहे.
Rishi Sunak
Rishi SunakDainik Gomantak
Published on
Updated on

Rishi Sunak News: ब्रिटन आर्थिक आघाडीवर संघर्ष करत आहे. त्याची अर्थव्यवस्था संकुचित होत आहे. दरम्यान, पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी अनेक पावले उचलण्याची घोषणा केली आहे. ब्रिटिश सरकारने 55,000 कोटी पौंडची आर्थिक योजना सादर केली आहे.

दरम्यान, अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी सरकारचा आपत्कालीन अर्थसंकल्प मांडला आहे, ज्यामध्ये कर दरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे, ब्रिटनमधील महागाई (Inflation) आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही आहे. त्यामुळेच कराचे दर वाढवण्यात आले आहेत.

Rishi Sunak
Rishi Sunak यांचे इन्फोसिस कनेक्शन, अक्षता मूर्ती पुन्हा मालामाल

अर्थसंकल्पातील प्रमुख घोषणा

  • ऊर्जा कंपन्यांवरील विंडफॉल टॅक्स वाढवण्यात आला आहे. तो 25% वरुन 35% पर्यंत कमी केला आहे.

  • इलेक्ट्रिक जनरेटरवर 45 टक्के तात्पुरता कर लावण्यात आला आहे.

  • वार्षिक 1.25 लाख पौंड पर्यंत कमावणारे लोक देखील सर्वोच्च कराच्या कक्षेत येतील.

  • 2025 पासून इलेक्ट्रिक वाहनांवर उत्पादन शुल्क आकारले जाणार नाही.

तसेच, अर्थसंकल्पासह सादर केलेल्या स्वतंत्र युनिट ओबीआर (Office for Budget Responsibility) च्या अहवालात म्हटले की, रशिया आणि युक्रेन युद्ध उर्जेच्या किमतींमध्ये प्रचंड वाढीसाठी जबाबदार आहे. अहवालानुसार 2024 पर्यंत अर्थव्यवस्थेत (Economy) सुधारणा होण्याची आशा नाही.

Rishi Sunak
Rishi Sunak Latest News: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी खास संदेश देत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

ब्रिटनमध्ये महागाईने विक्रम मोडला

ब्रिटनमधील महागाईने 41 वर्षांचा विक्रम मोडला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2022 मध्ये, ब्रिटनमधील (Britain) किरकोळ महागाई 11.1 टक्क्यांपर्यंत वाढली आहे, जी 1981 नंतरची सर्वोच्च पातळी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com