जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणून अक्षय उर्जेवर भर द्या - अँटोनियो गुटेरेस

''अक्षय ऊर्जेवरील गुंतवणूक दरवर्षी किमान तिप्पट होणे आवश्यक''
António Guterres
António GuterresDainik Gomantak

जगभरातील जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित असून ते वाढत्या लोकसंख्येबरोबर न वाढता कमी होत जाणार आहेत. त्यामूळे सद्या जग उर्जा संकटाचा सामना करत असले तरी हे संकट पुढील काळात आणखी गडद होणार आहे. याला पर्याय म्हणून आपण अक्षय ऊर्जेचा वापर करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी केलं. जागतिक हवामान संघटनेने सादर केलेल्या अहवालानंतर ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, हरितगृह वायू उत्सर्जनावर अंकुश ठेवण्याची कृती अतिशय संथ असल्याने जग आपत्तीकडे जात असल्याचा इशारा गुटेरेस यांनी दिला. अक्षय ऊर्जेतील खाजगी आणि सार्वजनिक गुंतवणूक दरवर्षी किमान $ 4 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत तिप्पट झाली पाहिजे असेही गुटेरेस म्हणाले.

António Guterres
दोन देशांना जोडणाऱ्या भुयाराचा तस्करीसाठी वापर; 77 कोटींचं अमलीपदार्थ जप्त

अहवालानुसार 2021 मध्ये समुद्राच्या पातळीत वाढ झाली असून समुद्रातील उष्णता, हरितगृह वायूंचे प्रमाण आणि महासागरातील आम्लीकरणामुळे हवामानावर भयानक परिणाम झाले आहेत. जागतिक ऊर्जा प्रणाली कोलमडलेली असल्याचेही गुटेरेस म्हणाले. तसेच युक्रेनमधील युद्धाचा उर्जा किंमतीवर परिणाम होत आहे. जीवाश्म इंधनांच्या साठा संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अक्षय उर्जा हे एकच शाश्वत भविष्य असल्याचे गुटेरेस म्हणाले.

António Guterres
अफगाणिस्तानच्या बाल्खमध्ये मोठा स्फोट, तीन जण जखमी

अँटोनियो गुटेरेस यांचा कार्यकाळ 2017 ते 2026

अँटोनियो गुटेरेस यांची संयुक्त राष्ट्रांच्या (UN) सरचिटणीस पदावर दुसऱ्यांदा निवड झाली आहे. त्यांनाही दुसरी टर्म द्यावी, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.अँटोनियो गुटेरेस यांचा दुसरा कार्यकाळ जानेवारी 2022 पासून सुरू होणार असून ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत या पदावर राहतील. यापूर्वी 2017 मध्ये त्यांची प्रथमच सरचिटणीसपदी नियुक्ती झाली होती.

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव म्हणून अँटोनियो गुटेरेस यांचे कार्य सर्वांच्या नजरेत चमकदार आहे. कठीण परिस्थितीत संवाद साधण्याची त्यांची क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळी बनवते आणि त्या कारणास्तव त्यांना 193 सदस्यीय संयुक्त राष्ट्र महासभेत मोठा पाठिंबा मिळाला आहे. अँटोनियो गुटेरेस यांनाही भारताचा पाठिंबा होता आणि महासचिव म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचे उत्कृष्ट वर्णन करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com