Elon Musk: एलन मस्क यांनी 3 दिवसात विकले टेस्लाचे 22 मिलियन शेअर्स; ट्विटर खरेदीमुळे अडचणीत आल्याची चर्चा...

सतत शेअर्स विकूनही अद्याप मस्क यांच्याकडेच टेस्लाची सर्वाधिक मालकी
Elon Musk
Elon MuskDainik Gomantak
Published on
Updated on

Elon Musk: ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटच्या खरेदीनंतर जगातील सर्वांधिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एलन मस्क हे अडचणी आल्याचे दिसत आहे. कारण गेल्या काही काळात ते सतत टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीचे शेअर्स विकत आहेत. गेल्या 3 दिवसांतच त्यांनी टेस्लाचे सुमारे 22 मिलियन (2.2 कोटी) शेअर्स विकले आहेत.

Elon Musk
iPhone 14 Saves Life: आयफोनमुळे वाचला पत्नीचा जीव; काय आहे नेमके प्रकरण वाचा...

मस्क यांनी विकलेल्या टेस्लाच्या या 22 मिलियन शेअर्सची किंमत सुमारे 3.6 अब्ज डॉलर म्हणजेच 29.81 हजार कोटी रुपये इतकी होते. दरम्यान, मस्क यांनी एका वर्षात आतापर्यंत टेस्लाचे 40 अब्ज डॉलर्सचे शेअर्स विकले आहेत. रॉयटर्सने याबाबतची माहिती दिली आहे. मस्क यांनी टेस्लाचे 94,202,321 शेअर्स सरासरी 243.46 प्रति डॉलर या दराने विकले आहेत.

ट्विटर ही कंपनी 44 अब्ज डॉलरला विकत घेतल्यापासून एलन मस्कच्या संपत्तीत सातत्याने घट होत आहे. त्यामुळेच मस्क यांना टेस्लाचे शेअर्स विकावे लागले आहेत. मस्कने 12 ते 15 डिसेंबर दरम्यान म्हणजेच अवघ्या तीन दिवसांत टेस्लाचे 2.2 कोटी शेअर्स विकले आहेत. ट्विटर विकत घेतल्यानंतर काही दिवसांनी, मस्क यांनी टेस्लाचे 19.5 दशलक्ष शेअर्स विकले होते आणि त्यातून त्यांना 3.95 अब्ज डॉलर्स मिळाले होते.

विशेष म्हणजे, मस्क हे टेस्लाचे मालक आहेत. काहीही न सांगता ते सतत टेस्लाचे शेअर्स विकत आहेत, त्यामुळे शेअरधारक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. ट्विटर विकत घेतल्यापासून मस्कच्या अडचणीत वाढ होत आहे. स्पेसएक्स या कंपनीचेही सीईओ असलेल्या मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये ट्विटरची सूत्रे हाती घेतली. त्यासाठी ऑगस्टमध्ये, मस्क यांनी ट्विटर अधिग्रहणासाठी टेस्लाचे सुमारे 7 अब्ज डॉलर किमतीचे शेअर्स विकले होते.

Elon Musk
Bilawal Bhutto: पंतप्रधान मोदींबाबत बोलताना भुट्टोंची जीभ घसरली; '1971' विसरला काय? भारताचा खोचक सवाल

टेस्लाच्या शेअर्समध्ये या वर्षी सातत्याने घसरण झाली आहे. कंपनीचा शेअर 2.6 टक्क्यांनी घसरून 156.80 डॉलरवर आला आहे. टेस्लाचे बाजार भांडवल देखील 495 अब्ज डॉलरवर आले आहे. टेस्लाचा स्टॉक या वर्षी 55 टक्क्यांनी घसरला आहे, याचा अर्थ तो जवळजवळ निम्मा झाला आहे.

शेअर्स विकल्यानंतरही मस्क हेच टेस्लाचे सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत, ते टेस्लाचे शेअर्स सतत का विकत आहेत याची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. कंपनीमध्ये सर्वाधिक 13.4 टक्के मालकी त्यांच्याकडे आहे. गेल्या वर्षी कंपनीचे बाजारमूल्य 1 लाख कोटी डॉलर होते, मात्र आता ते 495 कोटी रुपयांवर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com