Elon Musk: ट्विटरच्या कर्मचाऱ्यांचे मोफत जेवण, वर्क फ्रॉम होम बंद; 80 तास काम करावे लागणार

एलन मस्क यांचा इशारा; घरून काम करणार असाल तर राजीनामा मंजूर
Elon Musk
Elon MuskDainik Gomantak
Published on
Updated on

Elon Musk: एलन मस्क यांना ट्विटर (Twitter) चे बॉस बनून केवळ दोन आठवडेच झाले आहेत, पण या काळात ट्विटरची एवढी चर्चा झाली आहे तेवढी कधीच झाली नव्हती. तसेच या काळात ट्विटरमध्ये अनेक बदलही झाले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना ट्विटरने घरी पाठवले आहे. त्यातच आता एलन मस्क यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आदेश काढला आहे.

Elon Musk
Russia-Ukraine War: धक्कादायक! सैनिकांच्या छातीत सापडला जिवंत बॉम्ब, डॉक्टरही झाले चकीत

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना आता आठवड्यात 80 तास कामाची सक्ती असणार आहे. तसेच ऑफिसकडून मिळणाऱ्या सुविधांमध्येही कपात करण्यात आली आहे. आता ट्विटरच्या ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना मोफत जेवण मिळणार नाही.

तसेच कोरोनाकाळात देण्यात आलेली वर्क फ्रॉम होम सुविधा देखील बंद करण्यात आली आहे. जर घरून काम करायची इच्छा असेल तर तुमचा राजीनामा मंजुर केला आहे, असे समजा, असे मस्क याने कर्मचाऱ्यांना सांगितले आहे.

Elon Musk
Nepal Election : नेपाळ निवडणुकीत 'ही' अभिनेत्री उतरणार रिंगणात; हिंदुत्ववादी पक्षाचा करणार प्रचार

मस्क यांनी ट्विटरच्या भविष्याबाबत तसेच आर्थिक स्थितीबाबत बोलताना सांगितले की, कंपनीला 8 डॉलर चे सब्सक्रिप्शन प्रोडक्ट बनविण्याची गरज आहे. मस्क यांनी यापुर्वीच ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना कंपनी दिवाळखोर होण्याची भीतीही बोलून दाखवली आहे.

दरम्यान, ट्विटरमध्ये एलन मस्क यांच्या विविध फतव्यांनंतर कर्मचाऱ्यांकडून राजीनामा दिला जात आहे. या राजीनामासत्रात विविध विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नुकतेच प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता अमेरिकन नियंत्रकांकडून कंपनीला गंभीर इशाला देण्यात आला आहे. नवी फीचर्स सादर केल्यानंतर हा प्रकार घडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com