Nepal Election : नेपाळ निवडणुकीत 'ही' अभिनेत्री उतरणार रिंगणात; हिंदुत्ववादी पक्षाचा करणार प्रचार

Nepal Election : बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोईराला यांनी नेपाळमध्ये 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी हिंदुत्ववादी राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी (RPP) साठी प्रचार करणार असल्याची घोषणा केली आहे.
Manisha Koirala in Nepal Election
Manisha Koirala in Nepal Election Dainik Gomantak

भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये 20 नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. दरम्यान, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला निवडणुकीपूर्वी नेपाळमध्ये हिंदुत्ववादी पक्षाचा प्रचार करणार असल्याची बातमी समोर आली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोईराला यांनी नेपाळमध्ये 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी हिंदुत्ववादी राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी (RPP) साठी प्रचार करणार असल्याची घोषणा केली आहे. (Manisha Koirala in Nepal Election )

Manisha Koirala in Nepal Election
Dengue Fever : सगळीकडे डेंग्यूची सा‍थ!स्वत:चा बचाव करण्यासाठी घरीच बनवा ही खास पेये; राहाल निरोगी

मनीषा कोईराला यांनी आरपीपीला मतदान करण्याचे आवाहन केले

पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली पारंपारिक आणि राष्ट्रवादी शक्तींना डावलल्याने देशाचे खूप नुकसान झाले आहे, असे मत अभिनेत्री मनीषा कोईराला यांनी व्यक्त केले. त्यामुळे त्या लोकांना राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाला (आरपीपी) मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.

अभिनेत्री दोन निवडणूक रॅलींना संबोधित करणार

नेपाळच्या पहिल्या निर्वाचित पंतप्रधान आणि नेपाळी काँग्रेसचे संस्थापक बिश्वेश्वर प्रसाद कोईराला यांची नात मनीषा कोईराला शुक्रवारी पक्षाच्या किमान दोन निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोईराला यांनी ट्विट केले की, मी माझ्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या बाजूने प्रचार करण्यासाठी घरी जात आहे. राजेंद्र लिंगडेंच्या रूपाने राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाला तरुण, गतिमान आणि दूरदृष्टी असलेला नेता मिळाला आहे.

मनीषा कोईराला म्हणाल्या की, पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली जातीय तेढ आणि पारंपारिक आणि राष्ट्रवादी शक्तींच्या बहिष्कारामुळे देशाच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीचे मोठे नुकसान झाले आहे. हे दुरुस्त करणे आवश्यक आहे. मी अधिक भागात प्रवास करू शकणार नाही, परंतु कृपया RPP ला मत द्या आणि खात्री करा. जय नेपाळ.

20 नोव्हेंबर रोजी नेपाळमध्ये एकाच टप्प्यात संसदीय आणि प्रांतिक निवडणुका होत असून बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोईराला यांनी हिंदुत्ववादी राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी (RPP) साठी प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com