Video: तुरुंगातून पळाला सर्वात खतरनाक माफिया, बंदुकधाऱ्यांचा टीव्ही चॅनलमध्ये हैदोस; 'या' देशात उडाली खळबळ!

Ecuador Crime News: थेट टेलिव्हिजन चॅनलमध्ये बंदूकधारी हल्लेखोरांनी घातलेल्या गोंधळाचा धक्कादायक व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे.
Crime
CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Ecuador Crime News: थेट टेलिव्हिजन चॅनलमध्ये बंदूकधारी हल्लेखोरांनी घातलेल्या गोंधळाचा धक्कादायक व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे. या घटनेनंतर देशाच्या लष्कराला या हल्लेखोरांच्या विरोधात मैदानात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे प्रकरण दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरमधील आहे. इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी मंगळवारी देशातील शक्तिशाली गुन्हेगारी गटांविरुद्ध लष्करी कारवाईचे आदेश दिले.

दरम्यान, हुडी परिधान केलेल्या बंदूकधारी हल्लेखोरांनी एका टेलिव्हिजन स्टुडिओवर हल्ला केला आणि लष्कर आणि नागरिकांना ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा इक्वाडोरचा सर्वात खतरनाक गुन्हेगार तुरुंगातून पळून गेला आहे. हा खतरनाक गुन्हेगार त्याच्या सेलमधून गायब झाल्यानंतर देशात मोठी खळबळ उडाली. बिघडलेली परिस्थिती पाहून सरकारने इक्वाडोरमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे.

Crime
Iran-America Tension: इराणच्या 'सर्वात शक्तिशाली ठिकाणी' मोठा स्फोट, अमेरिकेसोबतचा वाढू शकतो तणाव

दुसरीकडे, संपूर्ण इक्वेडोरमध्ये मोठ्या संख्येने लष्कर विशेष मोहीम राबवत आहेत. ते अॅडॉल्फो मॅकियास, उर्फ ​​​​फिटो, शक्तिशाली ड्रग गँग लॉस चोनेरोसचा दोषी कंमाडरला पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. अलिकडच्या वर्षांत, मेक्सिकन आणि कोलंबियन कार्टेलशी संबंधित प्रतिस्पर्धी गॅंग्जनी इक्वाडोरवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे, जो कोलंबिया आणि पेरु (सर्वात मोठे कोकेन निर्यातदार) यांच्यामध्ये दीर्घकाळ शांततापूर्ण आश्रयस्थान राहिला आहे. मात्र, या स्पर्धेमुळे देशात हिंसाचार उसळला आहे.

"मी देशाच्या लष्करला या गॅंग्जवर लष्करी कारवाई सुरु करण्याचे आदेश दिले आहेत," असे अध्यक्ष नोबोआ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. बंदुका आणि ग्रेनेडसह सशस्त्र हल्लेखोरांनी ग्वायाकिलमधील टीसी टेलिव्हिजनच्या स्टुडिओवर हल्ला केल्यावर त्यांचे हे वक्तव्य आले आहे. जिथे गोळीबारादरम्यान एक महिला असे म्हणताना ऐकू येत आहे की: "कृपया शूट करु नका."

दुसरीकडे, सशस्त्र हल्लेखोरांनी घाबरलेल्या क्रू मेंबर्संना बंदूकीचा धाक दाखवला. तर स्टुडिओमधील दिवे बंद केल्यामुळे एक व्यक्ती किंचाळताना व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे. तो म्हणतो की, "ते आम्हाला मारण्यासाठी आले आहेत. देवा आम्हाला वाचव. गुन्हेगार सुटले आहेत," टीसी कर्मचाऱ्याने एएफपीला व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये हा व्हिडिओ पाठवला आहे.

Crime
America: अमेरिकन विद्यार्थ्यांना आता शिख धर्माचे धडे, सोशल स्टडीज् मध्ये केला समावेश

दरम्यान, 36 वर्षीय नोबोआ यांची ऑक्टोबरमध्ये दक्षिण अमेरिकन देशात अमली पदार्थांशी संबंधित गुन्हेगारी आणि हिंसाचाराविरुद्ध लढा देण्याच्या आश्वासनावर राष्ट्राध्यक्षपदी वर्णी लागली. त्यांचा देश एकेकाळी शांततेसाठी ओळखला जात होता, परंतु आता अमेरिका आणि युरोपमधून होणाऱ्या कोकेनच्या व्यापाराचा सर्वात मोठा अड्डा बनला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com