इंडोनेशियामध्ये (Indonesia) भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले आहेत. यानंतर इंडोनेशियामध्ये सुनामीचा इशारा देखील जारी करण्यात आला आहे. याबाबात हवामान खात्याने इंडोनेशियाने पूर्व नुसा टेंगारा येथे 7.5 तीव्रतेच्या भूकंपानंतर (Indonesia Earthquake) सुनामीचा इशारा दिला आहे. त्याच वेळी, युरोपीय-भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने भूकंपाची तीव्रता 7.7 दिली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू पाच किमी खोलीवर असल्याचे सांगण्यात आले आहे. (Earthquake in Indonesia IMD also warn for tsunami)
पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने म्हटले आहे की भूकंप केंद्राच्या 1,000 किमी अंतरावर असलेल्या किनारपट्टीवर धोकादायक लाटा येण्याची शक्यता आहे. भूकंपामुळे होणारी जीवितहानी कमी असल्याचे यूएसजीएसने म्हटले आहे. तथापि, या प्रदेशात नुकत्याच झालेल्या भूकंपांमुळे त्सुनामी आणि भूस्खलनाचा धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. GFZ जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेस (GFZ) ने सांगितले की या वर्षी मे महिन्यात शुक्रवारी इंडोनेशियन सुमात्रा बेटाच्या वायव्य किनारपट्टीवर 6.6 तीव्रतेचा भूकंप झाला होता. इंडोनेशियामध्ये भूकंपाचे धक्के नेहमीच जाणवत असतात.
इंडोनेशिया प्रशांत महासागराच्या रिंग ऑफ फायरवर स्थित आहे, ज्यामुळे नेहमीच भूकंपाचे धक्के आणि सुनामी येतात. रिंग ऑफ फायर ही चाप सारखी असते, जिथे टेक्टोनिक प्लेट्स अनेकदा हलतात, ज्यामुळे भूकंप होतात.ही चाप जपानपासून आग्नेय आशिया आणि पॅसिफिक खोऱ्यापर्यंत पसरलेली आहे. 2004 मध्ये इंडोनेशियामध्ये मोठा भूकंप झाला होता. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 9.1 एवढी होती. त्यामुळे एवढी भयानक त्सुनामी आली होती की ज्यामुळे दक्षिण आशियामध्ये 2.2 लाख लोकांचा मृत्यू झाला होता . एकट्या इंडोनेशियामध्ये 1.7 लाख लोकांचा मृत्यू झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.