अफगाणिस्तानासह LAC वर चीन-भारताची चर्चा

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (Dr. S. Jaishankar) यांनी गुरुवारी दुशान्बे (Dushanbe) येथे चीनी (China) समकक्ष वांग यी (Wang YI) यांची भेट घेतली.
Dr. S. Jaishankar & Met Chinese FM Wang Yi in Dushanbe
Dr. S. Jaishankar & Met Chinese FM Wang Yi in DushanbeDainik Gomantak
Published on
Updated on

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (Dr. S. Jaishankar) यांनी गुरुवारी दुशान्बे (Dushanbe) येथे चीनी (China) समकक्ष वांग यी (Wang YI) यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी शांतता आणि सौहार्द बहाल करण्यासाठी पूर्व लडाखमधील (Ladakh) सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेत प्रगती करण्याचे आवाहन केले आहे. (Dr. S. Jaishankar & Met Chinese FM Wang Yi in Dushanbe)

जयशंकर आणि वांग शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO Summit) च्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी दुशान्बेमध्ये हजर आहेत. जयशंकर यांनी ट्विट करत."आम्ही सीमा भागातून सैन्य हटवण्यावर चर्चा केली असून,या संदर्भात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रगती आवश्यक आहे. द्विपक्षीय संबंधांच्या विकासासाठी देखील हे आवश्यक आहे." अशी माहिती दिली आहे.

बैठकीनंतर जयशंकर म्हणाले की, दोन्ही बाजूंनी जागतिक विकासावरही विचारांची देवाणघेवाण झाली आहे. बैठकीत अफगाणिस्तानमधील घडामोडींवरही चर्चा झाल्याचे समजत आहे. चीनने भारतासोबतचे आपले संबंध कोणत्याही तिसऱ्या देशाच्या नजरेतून पाहू नये असे स्पष्ट मत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मांडले आहे.तसेच आशियाई एकजुटतेच्या बाबतीत चीन आणि भारताला एक उदाहरण ठेवावे लागेल.असेही त्यांनी सांगितले आहे.

Dr. S. Jaishankar & Met Chinese FM Wang Yi in Dushanbe
Afghanistan: तालिबान सरकारचे मंत्री काबुलमधील राष्ट्रपती भवनात भिडले!

एका संस्थेच्या वृत्ता नुसार नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांना चीनच्या सीमेवरील अलीकडील परिस्थितीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, 'आमची भूमिका सारखीच आहे की उर्वरितमधील संघर्ष संपल्यानंतर दोन्ही बाजूंचे सैन्य परत येतील. आणि तेंव्हाच डी-एस्केलेशनचा मार्ग मोकळा होऊ शकतो, संपूर्ण शांतता आणि सौहार्दाची पुनर्स्थापना सुनिश्चित करू शकतो आणि द्विपक्षीय संबंधांमध्ये शक्य प्रगती करू शकतो.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com