Afghanistan: तालिबान सरकारचे मंत्री काबुलमधील राष्ट्रपती भवनात भिडले!

या मतभेदांमुळे राजधानी काबूलमधील (Kabul) राष्ट्रपतींच्या निवासस्थानी तालिबानी नेते भिडले असल्याचे सांगण्यात येत आहे.
Mulla Abdul Gani Bardar
Mulla Abdul Gani BardarDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सरकार स्थापनेपूर्वी तालिबानमध्ये (Taliban) अंतर्गत खळबळ उडाली आहे. बीबीसीच्या अहवालानुसार, सरकार स्थापनेच्या काही दिवस आधी तालिबानच्या प्रमुख नेत्यांमधील मतभेद समोर आले आहेत. या मतभेदांमुळे राजधानी काबूलमधील (Kabul) राष्ट्रपतींच्या निवासस्थानी तालिबानी नेते भिडले असल्याचे सांगण्यात येत आहे. तालिबानमधील दोन गटांच्या समर्थकांमध्ये राष्ट्रपतींच्या निवासस्थानामध्येही हाणामारी झाली आहे. तालिबान्यांनी अमेरिकेवर (America) कशामुळे विजय मिळवला आणि नवीन मंत्रिमंडळात अधिकारांचे विभाजन कसे होईल याबद्दल जोरदार चर्चा झाली आहे. मात्र हे वृत्त अधिकृत असले तरी तालिबानने हे वृत्त स्वीकारण्यास नकार दिला आहे.

Mulla Abdul Gani Bardar
तालिबान सरकारला मान्यता देण्यासाठी पाकिस्तान उतावळा

शीर्ष नेत्यांमध्ये चर्चा

तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूल ताब्यात घेऊन संपूर्ण अफगाणिस्तान आपल्या ताब्यात घेतला. तेव्हापासून अफगाणिस्तानला 'इस्लामी राजवट' असलेला देश घोषित करण्यात आले. तालिबानचे अंतरिम मंत्रिमंडळात (Interim Cabinet) सर्व पुरुष असून फक्त काही वरिष्ठ नेत्यांनाच मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच काही असे नेते आहेत जे 20 वर्षात अमेरिकन सैन्यावर हल्ल्यांमध्ये सहभागी झाले आहेत. तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरदार (Mulla Abdul Gani Bardar) गेल्या काही दिवसांपासून अनुपस्थित असताना हा वाद ऐरणीवर आला आहे. बरादर यांच्या मृत्यूच्या बातम्याही माध्यमांमध्ये येऊ लागल्या होत्या, पण खुद्द बरदार यांनी हे अहवाल फेटाळले आहेत. बीबीसी पश्तोने तालिबानच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, बरदार, खलील-उर-रहमान हक्कानी, ज्यांना निर्वासितांसाठी मंत्री बनवण्यात आले असून हक्कानी नेटवर्कमधील एक प्रमुख नेता यांच्यात जोरदार वाद सुरु झाला, यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा वाद झाला.

कशामुळे अमेरिकेवर विजय झाला

कतारमधील तालिबानचा एक वरिष्ठ नेता आणि या लोकांशी संबंधित असलेल्या व्यक्तीनेही याची पुष्टी केली आहे की, गेल्या आठवड्यात अध्यक्षीय निवासस्थानी वाद झाला होता. सूत्रांकडून सांगितले जात आहे की, नवीन उपपंतप्रधान बनलेले बरदार हे अंतरिम सरकारच्या संरचनेवर खुश नव्हते. या व्यतिरिक्त, अफगाणिस्तानात अमेरिकेवर विजयाचे श्रेय कोणाला द्यायचे याबद्दल मतभेद आहेत.

नवीन सरकारमधील नेत्यांनी गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या मुत्सद्देगिरीवर भर दिला पाहिजे असे बरदार यांनी आपले मत आहे. तर हक्कानी गटाच्या लोकांना विश्वास आहे की, लढल्याशिवाय काहीही साध्य होणार नाही. हक्कानी गटामध्ये मुख्यतः तालिबानचे वरिष्ठ नेते आहेत. बरदार यांनी पहिल्यांदा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी 2020 मध्ये दूरध्वनीवर बोलले होते. यापूर्वी त्यांनी दोहा करारावर स्वाक्षरी केली होती, ज्यात अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारीचा समावेश होता.

Mulla Abdul Gani Bardar
अफगाणिस्तानात सध्या स्थापन केलेले सरकार तात्पुरते; तालिबान प्रवक्त्यांची माहिती

वेगवेगळ्या विधानांनी कनफ्यूजन

बरादार यांनी सोमवारी एक ऑडिओ जारी केला. या ऑडिओमध्ये तालिबानच्या सह-संस्थापकाकडून असे सांगण्यात आले की, ते पूर्णपणे ठीक असून आपण दौऱ्यावर असल्याची पुष्टी केली. मात्र, या ऑडिओची अद्याप पुष्टी झालेली नाही. राष्ट्रपती भवनात कोणतीही चर्चा झाल्याचे तालिबान्यांनी नाकारले आहे. त्याचबरोबर बरदार पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही सांगण्यात येत आहे. तालिबान आणि बरदार यांनी दिलेली विधाने कनफ्यूजन करणारी आहेत, आणि त्यांच्याकडून अनेक गोष्टींचा अंदाज लावला जात आहे. त्यानंतर एका प्रवक्त्याकडून असे सांगण्यात आले की, ते कंधारला गेले होते जिथे ते तालिबानच्या सर्वोच्च नेत्याला भेटणार होते. पण नंतर बीबीसी पश्तोला सांगण्यात आले की, बरादार थकले आहेत आणि त्यांना विश्रांती घेण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत तालिबानचा सर्वोच्च कमांडर हबीतुल्ला अखुंजदा यांच्याबद्दल एक गूढ कायम आहे. अखुंजदा कधीही सार्वजनिक ठिकाणी दिसला नाही. तो तालिबानच्या राजकीय, लष्करी आणि धार्मिक घडामोडींचा मास्टर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com