Baba Vanga Predictions: तिसऱ्या महायुद्धाची नांदी? बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ठरणार खरी? अमेरिका-व्हेनेझुएला संघर्षामुळे जग दहशतीत!

Baba Vanga Predictions: नवीन वर्ष 2026 सुरु होऊन जेमतेम तीन दिवस उलटले असतानाच जगाला हादरवणारी एक मोठी लष्करी कारवाई समोर आली.
Baba Vanga Predictions
Baba VangaDainik Gomantak
Published on
Updated on

Baba Vanga Predictions: नवीन वर्ष 2026 सुरु होऊन जेमतेम तीन दिवस उलटले असतानाच जगाला हादरवणारी एक मोठी लष्करी कारवाई समोर आली. 3 जानेवारीच्या मध्यरात्री अमेरिकेने व्हेनेझुएलावर अचानक हवाई हल्ला करुन संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. या अनपेक्षित आणि वेगवान हल्ल्याने बुल्गारियाच्या प्रसिद्ध भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांनी 2026 वर्षाबद्दल वर्तवलेली भविष्यवाणी आता चर्चेच्या केंद्रस्थानी आली. बाबा वेंगा यांनी 2026 मध्ये अनेक मोठे संघर्ष आणि युद्धांचा इशारा दिला होता, ज्याची प्रचिती वर्षाच्या सुरुवातीलाच येऊ लागली आहे.

3 जानेवारीची ती थरारक रात्र

दरम्यान, 3 जानेवारीच्या रात्री अमेरिकेने (America) 'ऑपरेशन' राबवत सुमारे 150 लढाऊ विमाने आणि फायटर जेट्सच्या ताफ्यासह व्हेनेझुएलाच्या सुरक्षा कड्याला खिंडार पाडले. अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाचे लष्करी तळ, विमानतळ आणि बंदरांना लक्ष्य केले, ज्यात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

अमेरिकन कमांडोंनी रात्रीच्या अंधारात राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या निवासस्थानी प्रवेश केला. विशेष म्हणजे, मादुरो आणि त्यांची पत्नी झोपेत असताना त्यांना बेडरुममधून बाहेर ओढून काढले. त्यानंतर त्यांना थेट विमानाने अमेरिकेत आणण्यात आले. सध्या मादुरो न्यूयॉर्कमधील डिटेंशन सेंटरमध्ये असून त्यांच्यावर फेडरल कोर्टात खटला चालवला जाणार आहे.

Baba Vanga Predictions
Baba Vanga Predictions: 2026 मध्ये 'या' 5 राशीचे लोक होणार मालामाल, बाबा वेंगांची 'अफाट धनलाभा'ची भविष्यवाणी; शनिदेवाची राहणार कृपा!

बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांचे भयानक संकेत

प्रसिद्ध भविष्यवेत्ता नास्त्रेदमस आणि बाबा वेंगा यांनी 2026 बद्दल केलेले भाकीत अतिशय चिंताजनक आहे. त्यांच्या मते, हे वर्ष मोठ्या युद्धांचे साक्षीदार ठरेल. एवढचं नाहीतर जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करेल. धर्माच्या आणि राष्ट्राच्या नावावर लोक एकमेकांशी भिडतील आणि सर्वत्र हिंसाचाराचे साम्राज्य पसरेल.

बाबा वेंगा यांनी विशेषतः 'समुद्रमार्गे होणारे हल्ले' आणि 'व्यापारी मार्ग खंडित होणे' यावर भर दिला होता. अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करण्यापूर्वी कॅरिबियन समुद्रातून त्यांची नाकेबंदी केली, जे या भविष्यवाणीशी तंतोतंत जुळत आहे. यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होऊन संपूर्ण जगाला भीषण महागाईचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

Baba Vanga Predictions
Baba Vanga Predictions: बाबा वेंगाची 6 भाकितं ठरली खरी, भविष्यातील धोक्यांकडे जगाचे वेधले लक्ष; 2026 वर्षाबाबत सतावू लागली चिंता

अंधाराचा फायदा आणि जागतिक तणाव

बाबा वेंगा यांनी आपल्या भाकितात असे म्हटले होते की, शत्रू रात्रीच्या अंधाराचा आणि अचानक मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन मोठे हल्ले करतील. अमेरिकेने वेनेझुएलात ज्या प्रकारे चोरपावलांनी घुसून मादुरो यांना उचलले, ते पाहता अनेकांना ही भविष्यवाणी खरी ठरत असल्याचे वाटत आहे. तसेच, 2026 मध्ये पूर्व आशियाई देशांमधील परस्पर तणाव विकोपाला जाऊन त्याचे रुपांतर मोठ्या युद्धात होईल, असेही त्यांनी सांगितले होते. या युद्धात रशिया, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स (France) यांसारख्या महासत्तांना उतरणे भाग पडेल, ज्यामुळे युद्धाची व्याप्ती वाढेल.

Baba Vanga Predictions
Baba Vanga Prediction: बाबा वेंगा यांच्या भाकिताने पुन्हा वाढवली चिंता, 2023 बाबत धक्कादायक खुलासे!

तिसऱ्या महायुद्धाची टांगती तलवार

बाबा वेंगा यांच्या दाव्यानुसार, 2026 मधील हे संघर्ष केवळ प्रादेशिक राहणार नाहीत. तैवानवरील चीनची संभाव्य लष्करी कारवाई आणि रशिया-अमेरिका यांच्यातील थेट संघर्षाचाही त्यांनी उल्लेख केला होता. जर हे संघर्ष थांबले नाहीत, तर पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही गोलार्धांतील देश युद्धाच्या आगीत होरपळून निघतील.

व्हेनेझुएलावरील या ताज्या हल्ल्याने जागतिक सत्तेचा समतोल बिघडवला असून आता रशिया आणि इतर मित्र राष्ट्र यावर काय भूमिका घेतात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. बाबा वेंगांच्या शब्दाप्रमाणेच 2026 ची सुरुवात झाली असून उर्वरित वर्ष मानवजातीसाठी किती संकटमय असेल, याची चिंता आता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com