इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई 'GAY', डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'रिपोर्ट वाचून मला हसू आलं'

Donald Trump Mojtaba Khamenei Gay Claim: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका ताज्या मुलाखतीत इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक दावा केला.
Donald Trump Mojtaba Khamenei Gay Claim
Donald Trump & Mojtaba KhameneiDainik Gomantak
Published on
Updated on

Donald Trump Mojtaba Khamenei Gay Claim: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका ताज्या मुलाखतीत इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक दावा केला, ज्यामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन गुप्तचर संस्था 'सीआयए'ने (CIA) त्यांना मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल गुप्त माहिती दिली असून त्यामध्ये इराणचे हे नवे सर्वोच्च नेते समलैंगिक (Gay) असल्याचा खुलासा करण्यात आला. ट्रम्प यांनी हा दावा केवळ एका मुलाखतीपुरता मर्यादित न ठेवता, इराणच्या लष्करी शक्तीला पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याची आणि इराणविरुद्धचे युद्ध जिंकल्याची घोषणाही यावेळी केली.

फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, सीआयएने त्यांना या संदर्भात एक गोपनीय अहवाल सोपवला. जेव्हा ट्रम्प यांना विचारण्यात आले की, मोजतबा समलैंगिक असल्याबद्दल सीआयएकडे ठोस पुरावे आहेत का, तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितले की, जर सीआयएने असा अहवाल दिला असेल, तर त्यांच्याकडे नक्कीच पुरावे असणार. मात्र, हा दावा केवळ सीआयएच्या अहवालावर आधारित आहे की इराणमध्येही (Iran) कोणी असे म्हणत आहे, याबद्दल अद्याप कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल दिलेली ही माहिती ट्रम्प यांच्यासाठीही सुरुवातीला धक्कादायक होती आणि ती वाचल्यावर त्यांना हसूही आले होते, असे त्यांनी नमूद केले.

Donald Trump Mojtaba Khamenei Gay Claim
Israel US Iran War: इराणला मोठा झटका! इस्रायली हल्ल्यात IRGC नौदल प्रमुख अलीरेझा तांगसिरी यांचा मृत्यू; होर्मुझच्या खाडीत तणाव शिगेला

इराणमध्ये समलैंगिकतेबद्दलचे कायदे अत्यंत कडक आहेत, याकडेही ट्रम्प यांनी लक्ष वेधले. इराण हा एक कट्टर इस्लामिक देश असून तिथे समलैंगिकता पूर्णपणे बेकायदेशीर मानली जाते. शरिया कायद्यानुसार समलैंगिकतेसाठी फाशीसारख्या कठोर शिक्षेची तरतूद आहे. अशा परिस्थितीत, एका मुस्लिम देशाच्या सर्वोच्च नेत्याचा अशा प्रकरणाशी संबंध असणे, ही त्या देशातील मूल्ये, परंपरा आणि इस्लामिक नियमांचे उल्लंघन असून ती मुस्लिम समुदायासाठी एक 'वाईट सुरुवात' असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. या दाव्यामुळे इराणच्या अंतर्गत राजकारणात आणि धार्मिक वर्तुळात मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण मोजतबा यांना स्वतःच्याच देशातील कायद्यानुसार शिक्षेला सामोरे जावे लागू शकते, असा टोलाही ट्रम्प यांनी लगावला.

Donald Trump Mojtaba Khamenei Gay Claim
Israel US Iran War: मध्य पूर्वेतील युद्धाच्या धामधुमीत भारताची मोठी खेळी! डॉलरची 'दादागिरी' संपवण्यासाठी रुपयाचा मास्टरस्ट्रोक; जगाचे विस्फारले डोळे

या खळबळजनक दाव्यासोबतच ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्या लष्करी मोहिमेत अमेरिकेने विजय मिळवल्याचे जाहीर केले. अमेरिकेने (America) इराणची नौसेना, वायुसेना आणि पायदळ यांची ताकद पूर्णपणे संपवली असून, आतापर्यंत इराणची 154 सागरी जहाजे बुडवण्यात आली आहेत, असा दावा त्यांनी केला. इराणचा क्षेपणास्त्र साठा आणि 'आयआरजीसी'चे तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून इराणच्या तेल आणि गॅस प्रकल्पांचेही मोठे नुकसान झाले. हे नुकसान इतके मोठे आहे की, त्यातून सावरण्यासाठी इराणला आता अनेक वर्षे लागतील, असेही ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले. ट्रम्प यांच्या या विधानांमुळे मध्य पूर्वेतील तणाव आता एका नवीन वळणावर पोहोचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com