VIDEO: ट्रम्प यांचे भाषण सुरु असतानाच इस्रायली संसदेत राडा, 'पॅलेस्टाईनला मान्यता द्या'चे झळकले पोस्टर, घटनेचा व्हिडिओ व्हायरल!

Israeli Parliament Video: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या संसदेला संबोधित करत असताना मोठी खळबळ उडाली.
Israeli Parliament Video
Israeli ParliamentDainik Gomantak
Published on
Updated on

Israeli Parliament Video: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या संसदेला संबोधित करत असताना मोठी खळबळ उडाली. ट्रम्प यांचे भाषण सुरु असतानाच दोन खासदारांनी विरोध प्रदर्शन करत गोंधळ घातला. ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान झालेला राडा अवघ्या जगाने पाहिला.

खासदारांनी दाखवले फलक

ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान हदश-ताअल (Hadash-Ta'al) पक्षाचे अध्यक्ष आयमेन ओदेह आणि याच पक्षाचे दुसरे खासदार ओफर कासिफ यांनी सभागृहात निषेध केला. खासदार आयमेन ओदेह यांनी ट्रम्प यांच्यासमोर एक विरोधाचे फलक दाखवून निषेध केला, ज्यावर 'पॅलेस्टाईनला मान्यता द्या' (Recognize Palestine) असे लिहिलेले होते. खासदार ओफर कासिफ यांनीही दुसरा फलक दाखवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही खासदारांनी ट्रम्प यांच्या दिशेने 'नरसंहाराचे चिन्ह' (Sign of Genocide) दाखवले आणि त्यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्नही केला. परिणामी, सुरक्षारक्षकांनी लगेच हस्तक्षेप करत या दोन्ही खासदारांना संसदेबाहेर काढले.

Israeli Parliament Video
Donald Trump: ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का? टॅरिफ रद्द झाल्यास अब्जावधी डॉलर्सचा परतावा देण्यासाठी ट्रेजरी विभाग सज्ज

ट्रम्प यांची त्वरित प्रतिक्रिया

संसदेत गदारोळ झाल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले भाषण थांबवले नाही. दोन्ही खासदारांना बाहेर काढल्यानंतर ट्रम्प यांनी शांतपणे प्रतिक्रिया दिली आणि "हा एक प्रभावी मार्ग आहे," असे म्हणत आपले भाषण सुरु ठेवले.

ट्रम्प यांनी शांततेचे केले आवाहन

यादरम्यान, इस्रायली संसदेला संबोधित करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्वेत शांततेचे युग सुरु झाल्याचे मत मांडले. ट्म्प म्हणाले, "आज अनेक वर्षांनंतर या पवित्र भूमीवर सूर्य उगवत आहे, शांती स्थापित आहे, बंदुका शांत आहेत आणि सायरनचे आवाज मंदावले आहेत. हा केवळ युद्धाचा शेवट नाही, तर दहशतवाद आणि मृत्यूचाही शेवट आहे आणि शांततेची सुरुवात आहे."

Israeli Parliament Video
Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

ट्रम्प यांनी या बदलाचे श्रेय इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना दिले. "मी त्यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी धैर्य आणि प्रयत्नांनी हे सर्व शक्य केले.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com