Afghanistan मुद्द्यावर बायडेन आणि बोरिस जॉन्सन यांच्यात चर्चा

व्हाईट हाऊसने एका निवेदनात म्हटले आहे. आमचे सैनिक, लष्करी कर्मचारी, नागरिक, स्थानिक कर्मचारी आणि इतर अफगाणींना सुरक्षित बाहेर काढण्याच्या प्रयत्नांवर प्रमुख्याने यात चर्चा करण्यात आली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काबूलमध्ये सुरू असलेल्या निर्वासन कार्याबद्दल चर्चा केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काबूलमध्ये सुरू असलेल्या निर्वासन कार्याबद्दल चर्चा केली आहे.Dainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन (US President Joe Biden and British Prime Minister Boris Johnson) यांनी काबूलमध्ये सुरू असलेल्या निर्वासन कार्याबद्दल चर्चा केली आहे. या दोन बड्या नेत्यांनी G-7 नेत्यांसोबत आगामी बैठकीदरम्यान अफगाणिस्तानसाठी समान दृष्टीकोनावर चर्चा (Discuss a similar approach for Afghanistan) करण्याची योजना आखली आहे.

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटीश पंतप्रधान जॉन्सन यांनी आज अफगाणिस्तानबद्दल चर्चा केली. असे व्हाईट हाऊसने एका निवेदनात म्हटले आहे. आमचे सैनिक, लष्करी कर्मचारी, नागरिक, स्थानिक कर्मचारी आणि इतर अफगाणींना सुरक्षित बाहेर काढण्याच्या प्रयत्नांवर प्रमुख्याने यात चर्चा करण्यात आली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काबूलमध्ये सुरू असलेल्या निर्वासन कार्याबद्दल चर्चा केली आहे.
तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळायला हवी मात्र... :बोरिस जॉन्सन

या दोघांनी जी -7 वर्चुअल लीडर्सच्या बैठकीच्या योजना यावर देखील चर्चा केली. सद्य स्थिती आणि अफगाणिस्तानातील निती याबाबत एक सामान्य दृष्टीकोन तयार करण्यावरही चर्चा करण्यात आली. गेल्या आठवड्यात, ब्रिटीश पंतप्रधानांनी सांगितले की 24 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानमधील सद्य परिस्थितीवर जी 7 देशांदरम्यान चर्चा होईल.

अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर तातडीने चर्चेसाठी मी मंगळवारी जी -7 च्या नेत्यांना बोलवीन, असे जॉन्सन यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने सुरक्षितपणे निर्वासन करण्यासाठी आणि मानवतावादी संकट टाळण्यासाठी गेल्या 20 वर्षांत झालेला लाभ सुरक्षित करण्यासाठी अफगाण लोकांचे समर्थन करणे अत्यावश्यक आहे.

यानंतर, रविवारी, व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जेन सासाकी यांनी जी -7 च्या आभासी बैठकीत बायडेन यांच्या सहभागाची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की जी -7 चर्चा अमेरिकन नागरिकांना बाहेर काढणे आणि असुरक्षित अफगाणिस्तान आणि निर्वासितांसाठी मानवतावादी दृष्टीकोनातून मदत करणे याभोवती फिरेल.

विशेष म्हणजे, अफगाणिस्तानमधील अनिश्चित सुरक्षा परिस्थितीमुळे अनेक देश आपल्या नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना तेथून बाहेर काढत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com