म्यानमारमध्ये(Myanmar) लष्करी राजवटीने (military rule) पुन्हा एकदा नव्याने तयार झालेल्या लढाऊ गटाशी सुरक्षा दलांची मंगळवारी मंडाले (Mandalay) शहरामध्ये चकमक उडाल्याचे वृत्त अनेक समाजमाध्यमांच्या हवाल्या देण्यात येत आहे. म्यानमारमधील मंडाले हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
1 फेब्रुवारीस म्यानमार लष्कराने देशाची सत्ता ताब्यात घेत लोकशाही नेत्या आंग सान सू ची (Aung San Suu Kyi) यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले लोकनियुक्त सरकार बरखास्त केले होते. त्यानंतर लष्करी राजवटीविरुध्द म्यानमारमध्ये सुरु झालेली निदर्शने सैनिकी बळाचा वापर करुन दडपून टाकण्यात आली होती. परिणामस्वरुप देशात 'पीपल्स डिफेन्स फोर्स' च्या नावाखाली लष्करी बंडाला विरोध करणारे एकत्र आले होते. (Myanmar Fighting in military civilian group)
मात्र हलकी शस्त्रे बाळगत असलेल्या म्यानमारमधील नागरी गटांच्या लष्कराशी होणाऱ्या चकमकी आतापर्यंत फक्त ग्रामीण भाग आणि लहान शहरांपुरत्याच मर्यादित होत्या, परंतु मंडालेतील सशस्त्र गटाकडून असा दावा करण्यात आला आहे की, म्यानमार लष्कराने त्यांच्या तळावर छापा घातल्यानंतर नागरी गटाने त्यास योग्य असं प्रत्युत्तर दिले. याबाबत लष्करी राजवटीच्या प्रवक्त्याने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मंडालेमधील वसतिगृहामध्ये बंडखोरांचा तळ होता.
भारत आणि थायलंडमध्ये दहा हजार निर्वासित
म्यानमार लष्कराशी उडालेल्या चकमकीनंतर जवळपास दहा हजार नागरिकांनी भारत (India) आणि थायलंडमध्ये (Thailand) पलायन केले, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या म्यानमारविषयक विशेष दूतांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. तसेच म्यानमारमधील स्थिती स्फोटक असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. संयुक्त राष्ट्र संघाचे (United Nations) सरचिटणीस अँतोनिओ गुटरेस (Antonio Guterres) यांच्या विशेष दूत ख्राईस्टीन स्कारनर बर्जेनर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये सांगितले की, ''म्यानमारमधील लोक वंचित बनले असून त्यांना कोणत्याही प्रकराची आशा उरलेली नाही, ते भितीच्या सावटाखाली जगत आहेत.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.