Business Tycoon: रातोरात बदलले डिलिव्हरी बॉयचे नशीब! 6000 कोटींचा बनला मालक

Millionaire: सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या तरुणाची कहाणी चित्रपटाच्या स्क्रिप्टपेक्षा कमी नाही.
Zomato
Zomato Dainik Gomantak
Published on
Updated on

Social Media Viral: सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या तरुणाची कहाणी चित्रपटाच्या स्क्रिप्टपेक्षा कमी नाही. पण काही प्रमाणात प्रत्यक्ष जीवनातून प्रेरणा घेऊन चित्रपटही बनवले जातात हेही खरे आहे. बेन फ्रान्सिस असे या तरुणाचे नाव सांगितले जात आहे. वयाच्या 30 व्या वर्षी, मेहनत आणि समर्पणाच्या बळावर तो जिमशार्क सारख्या कंपनीचा संस्थापक बनला आहे.

2012 मध्ये सुरुवात झाली

बेनने 2012 मध्ये कपड्यांचे दुकान सुरु केले. त्याने हे दुकान वडिलांच्या गॅरेजमध्ये सुरु केले होते. या छोट्याशा दुकानात विकले जाणारे कपडे एक दिवस एवढ्या मोठ्या ब्रँडमध्ये बदलतील याची त्याला कल्पनाही नव्हती. 'द सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कंपनी जीममध्ये घालण्यासाठी किंवा वर्कआउट करताना घालण्यासाठी कपडे बनवते.

Zomato
Baltic Sea Methane Leak: बाल्टिक समुद्रात 'मिथेन बॉम्ब'चा स्फोट, नॉर्ड स्ट्रीम गळतीमुळे युरोपत हाहाकार

बेन पिझ्झा डिलिव्हरी करायचा

अभ्यासासोबतच बेनचे पिझ्झा डिलिव्हरीचे कामही सुरु होते. बेनला जिममध्ये जाण्याची आवड होती. एकदा तो जिममध्ये जाण्यासाठी कपड्यांची खरेदी करायला गेला तेव्हा त्याला काहीही आवडले नाही. त्यानंतर त्याने स्वतःचे कपडे डिझाइन करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे त्याने बनवलेले कपडे विकायला सुरुवात केली, त्यामधून त्याने भरघोस नफा कमावला आणि कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

Zomato
इस्रायलच्या मालवाहू जहाजाचा समुद्रात स्फोट; दोन्ही देशांमध्ये वाढला तणाव

कंपनीची गगनभरारी

जिमशार्कने अवघ्या काही वर्षांत यूकेमध्ये ब्रॅंड बनवला आहे. बेन फ्रान्सिस याची कंपनीत 70% हिस्सेदारी आहे. 2021 मध्ये बेनची संपत्ती 6,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. समृद्ध जीवन जगणारा बेन कार आणि बाइक्सचा शौकिन आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com