अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलची (Kabul) वीजपुरवठा वाहिनी बंद करण्यात अली होती. आणि आता इस्लामिक स्टेट (Islamic State) या दहशतवादी गटाने सांगितले की, या वीजवाहिन्यावर हल्ला करून स्फोट करण्याचा कट आम्ही आखला होता. त्यामुळे काबूल बराचवेळ अंधारात बुडाले होते. गुरुवारी राजधानी काबूलमध्ये वीज खंडित झाल्याने (Power Cutting In Kabul) लोकांना समस्यांना सामोरे जावे लागले. तालिबानसाठी (Taliban) हा आणखी एक धक्का होता, जे अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर ते स्थिर करण्याचा प्रयत्न करत होते. तालिबानने 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानचा संपूर्ण ताबा घेतला. त्यानंतर देशभरात इस्लामिक स्टेटचे हल्ले वाढले आहेत.(Kabul power cut did by Islamic State in Afghanistan)
याबाबत इस्लामिक स्टेट-खोरासन (IS-K) ने शुक्रवारी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर प्रकाशित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खलिफाच्या सैन्याने वीज क्षेत्राला नुकसान पोहोचवण्यासाठी काबूलमधील विद्युत खांबावर बॉम्बस्फोट घडवला. काबूल आणि इतर काही प्रांतांना आयात वीज पुरवठा करणाऱ्या हाय-व्होल्टेज लाइनवर हा स्फोट झाला आहे . अफगाणिस्तान मुख्यत्वे त्याच्या उत्तर शेजारी उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तानमधून आयात केलेल्या विजेवर अवलंबून आहे, ज्यामुळे क्रॉस-कंट्री पॉवर लाईन्स हे लढवय्यांसाठी मुख्य लक्ष्य बनले आहेत.
एकीकडे तालिबान सतत आश्वासन देत आहे की ते IS-K शी लढा देत राहील. मात्र इस्लामिक स्टेट देशभरात सातत्याने हल्ले करत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, IS-K ने 15 ऑक्टोबर रोजी दक्षिण कंदाहार शहरातील शिया मशिदीवर केलेल्या आत्मघाती हल्ल्यामागे 60 ठार आणि 80 हून अधिक लोक जखमी झाले होते. आयएसचे आत्मघाती हल्लेखोर मशिदीत शिरले, जिथे मोठ्या संख्येने उपासक शुक्रवारच्या नमाजासाठी उपस्थित होते. यादरम्यान त्याने स्वत:ला उडवले. घटनेनंतर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मृतदेह जमिनीवर पडलेले आणि जखमींना रुग्णालयात नेताना दिसत आहे.
त्याचबरोबर इस्लामिक स्टेटने जगभरात राहणाऱ्या शिया मुस्लिमांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. खामा न्यूजच्या अहवालानुसार इस्लामिक स्टेटने म्हटले की शिया मुस्लिमांना धोक्याचा सामना करावा लागेल आणि त्यांना सर्वत्र लक्ष्य केले जाईल. "बगदादपासून खोरासानपर्यंत सर्वत्र शिया मुस्लिमांना लक्ष्य केले जाईल," असे दहशतवादी गटाने म्हटले आहे.इस्लामिक स्टेटच्या अल-नाबा या साप्ताहिक मासिकात हा इशारा प्रसिद्ध करण्यात आला आहे. खामा प्रेसने वृत्त दिले आहे की शिया मुस्लिमांना त्यांच्या घरांमध्ये आणि केंद्रांमध्ये लक्ष्य केले जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.