कोरोना महामारीमुळे जगातील 12 करोड लोक झाले गरीब, महिलांचे प्रमाण सर्वाधिक

सध्या जगातील गरिबीची पातळी वाढल्यामुळे आपण सर्वजण एका मोठ्या नैतिकतेच्या कचाट्यात अडकलो आहोत.
Antonio Guterres
Antonio GuterresDainik Gomantak
Published on
Updated on

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव (Covid 19) अजूनही कमी झालेला नाही. दुसकरीकडे मात्र या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. यातच आता जगातील 12 करोड लोक गरीब झाले असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. यासंबंधीचा खुलासा संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस (Antonio Guterres) यांनी स्वतः केला आहे. रविवारी, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिनानिमित्त सांगितले की, गेल्या दशकात गरीब लोकांच्या संख्येत वाढ झालेली दिसली नव्हती, मात्र कोरोना काळात गरीबीचे प्रमाण झपाट्याने वाढलेले दिसून आले. याबद्दल चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, सध्या जगातील गरिबीची पातळी वाढल्यामुळे आपण सर्वजण एका मोठ्या नैतिकतेच्या कचाट्यात अडकलो आहोत.

गुटरेस पुढे असेही म्हणाले, कोरोना काळात जगभरातील समाज आणि अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. यामुळे 12 कोटी लोक असहायतेच्या गर्तेत अडकले आहेत. जगात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत चालली आहे. त्यामुळे गरीबीमध्ये जीवन जगत असलेल्या लोकांचा सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार पूर्णपणे हिरावला गेला असल्याचेही यामधून दिसून आले आहे.

Antonio Guterres
आता WHO घेणार कोरोनाचा मुळासकट शोध; समिती स्थापन

तसेच, आपली ही लढाई केवळ गरिबीच्या विरोधात नसून जगात पसरलेल्या विषमतेच्या विरोधात प्रामुख्याने असावी. यावेळी बोलताना गुटरेस यांंनी पुन्हा एकदा कोरोना लस वितरणाच्या असमान वितरणाचा मुद्दा उपस्थित केला. ते यावेळी म्हणाले, 'या असमानतेमुळे जगात कोरोनाचे नव- नवे व्हेरिएंट आढळून आल्याने लाखो लोक मरण पावले. त्यामुळे अब्जावधी डॉलर्सचा फटकाही जागतिक अर्थव्यवस्थेला बसला आहे. हे तात्काळ थांबवणे अत्यंत गरजेचे बनले आहे. त्यासाठी या सर्वांची पुनर्बहाली करण्यासाठी गुंतवणूक सुनिश्चित करावी लागेल. त्यासाठी त्यांनी तीन कलमी आराखडाही सादर केला आहे. याचाच संदर्भ देताना गुटरेस पुढे म्हणाले की, 2030 पर्यंत लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि जगातील सर्व देशांनी एकत्र येऊन पुन्हा जागतिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गरीबी कोणत्या घटकांमुळे वाढते ते शोधून काढून त्यावर योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत. ग्रीन इकॉनामीचा फायदा घेऊन लोकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा लागेल. मात्र यामधून कोणीही वंचित राहणार नाही हे ही आपण सुनिश्चित करावे. कोरोना काळात जगात स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त गरीबी सहन करत असून परस्पर समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच जगातील लैंगिक असमानता दूर करण्यासाठी आर्थिक गुंतवणुकीच्या पद्धती स्वीकाराव्या लागतील असही त्यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com