COVID -19: कोरोनाचा किशोरांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम,अभ्यासातून मोठा खुलासा

किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर आणि बुद्धीवर परिणाम झाल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.
Goa Corona Update
Goa Corona UpdateDainik Gomantak

COVID -19: कोरोनाने वर्षभरापेक्षा जास्त काळ थैमान घातले होते.आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरीही त्याचे परिणाम दुरगामी झाले आहेत.त्यामध्ये लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यत सर्वांचा समावेश आहे. आता तरुणांच्या बुद्धीवर कोरोनाचा परिणाम झाला असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.बायोलॉजिकल सायकॅट्री: ग्लोबल ओपन सायन्स जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे.किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर आणि बुद्धीवर परिणाम झाल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.

दरम्यान ,अमेरिकेतील स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीच्या अभ्यासानुसार, 2020 या एकाच वर्षात वयस्कर लोकांच्या चिंतेत मागच्या वर्षीच्या तुलनेत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.या अभ्यासाचे लेखक इयान गोटलिब यांनी म्हटले आहे की ,"आम्हाला माहित होते की या महामारीने तरुणांच्या मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम केला आहे.परंतु हे माहित नव्हते की काय परिणाम केला आहे.महामारीने त्यांच्या बुद्धीवर परिणाम केला आहे."

Goa Corona Update
China Corona Latest News : चीनमध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होतोय! सरकारविरोधी निदर्शनांनंतर हजारो रुग्णांची नोंद

गोटलीब पुढे म्हणतात की ,जसजसे वय वाढत जाते तसतसे मेंदुच्या संरचनेत बदल होत जातात.किशोरावस्था आणि तारुण्याच्या टप्यावर याचा सगळेजण अनुभव घेतात.या अभ्यासानुसार ,कोरोनाच्या काळात ही प्रक्रिया वेगाने झाली आहे.त्वरित प्रक्रियेमुळे याचा विपरित परिणाम दिसुन आला आहे.यामुळे हिंसेसारखा प्रकार जास्त दिसुन येतो.या सगळ्याचा किशोरांच्या संपुर्ण एका पीढीवर गंभीर परिणाम दिसुन येण्याची शक्यता जास्त आहे.

Goa Corona Update
Global Corona Update: कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होतोय; चीन, ब्राझीलमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती

तसेच या अभ्यासाच्या नुसार ,जर या तरुणांच्या मेंदुमध्ये वेगाने विकास होत असेल तर वैज्ञानिकांना या पीढीसंबधित भविष्यातील कोणत्याही विकासाच्या शोधात असामान्य दर ध्यानात घ्यावा लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com