Global Corona Update: कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होतोय; चीन, ब्राझीलमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती

चीनपासून ब्राझील आणि जपानमध्ये झपाट्याने पसरत आहेत कोरोनाची प्रकरणे, अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन!
Global Corona Update
Global Corona UpdateDainik Gomantak

नुकतंच जग कोरोनातून सावरत असल्याचं चित्र बघायला मिळत असताना पुन्हा एकदा चिंताजनक बातमी समोर येतेय. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने उद्रेक दाखवायला सुरुवात केलीय.चीनपासून ब्राझील आणि जपानमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.अनेक शहरांत पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. चीन पुन्हा एकदा कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहे. "जर हा विषाणू दीर्घकाळ अनियंत्रित राहिला तर या विषाणूमुळे वृद्धांसारख्या लोकांना मोठा धोका निर्माण होईल", अशी चिंता चीनच्या सरकारने व्यक्त केलीय".

चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला असून तेथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र असल्याने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. चीन, ब्राझील आणि जपानमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे अलीकडेच चीनने स्थानिक लॉकडाऊन, मास टेस्टिंग, प्रवासी बंदी आणि इतर अनेक निर्बंध लागू केले आहेत.

Global Corona Update
Tsai Ing-wen Resigns: तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी का दिला सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखपदाचा राजीनामा?

चीनसोबतच ब्राझीलमध्येही कोरोना झपाट्याने पसरत आहे. ब्राझीलच्या 27 पैकी 15 राज्यांमध्ये कोविडची गंभीर प्रकरणे वेगाने वाढत आहेत. फेडरल हेल्थ रेग्युलेटर अन्विसा यांनी मंगळवारी विमानतळ आणि विमानांमध्ये मास्क अनिवार्य केले आहेत. जपानमध्ये शनिवारी कोरोनाच्या उद्रेकात १.२५ लाखांहून अधिक प्रकरणे दिसून आली आहेत. जपान टुडेच्या अहवालानुसार, शनिवारी जपानमध्ये 1,25,327 नवीन कोरोना रुग्ण आढळले, तर राजधानी टोकियोमध्ये 13,569 नवीन रुग्णांची नोंद झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com