Lucky Draw मध्ये पालटलं नशीब, 1 हजारात 'या' जोडप्याला मिळालं कोट्यवधीचं घर
Britain News: कधी कधी काही लोकांचे नशीब असे वळण घेते की, विश्वास बसत नाही. असेच काहीसे घडले आहे, ब्रिटनमधील या जोडप्यासोबत, ज्यांना क्षणात श्रीमंत व्हायला वेळ लागला नाही.
जोडप्याला केंट, यूके येथे कमी किमतीत एक आलिशान घर मिळाले आहे. या जोडप्याला फक्त 1 हजार रुपयांमध्ये 20 कोटींचे घर मिळाले, मात्र हे वाचून तुमचा बसणार नाही.
लकी ड्रॉ मध्ये नशीब पालटले
वास्तविक, असे घडले की, या जोडप्याने 1000 नोंदणी शुल्क भरुन लकी ड्रॉ स्पर्धेत भाग घेतला आणि सुदैवाने ते बंगल्याचे मालक बनले. किंग्सडाउनमधील या मालमत्तेची बाजारातील किंमत 20 कोटी रुपये आहे आणि या जोडप्याने ती केवळ 1000 रुपयांमध्ये त्यांच्या नावावर केली.
आता हे दाम्पत्य पुन्हा घर (House) विकून बक्कळ कमाई करण्याच्या इच्छेमध्ये आहे, त्यामुळे या ठिकाणी विक्रीचा फलकही लावण्यात आला आहे.
1 हजार रुपयांत 20 कोटींचे घर मिळाले
स्वतःचे घर असण्याचे स्वप्न पूर्ण करु शकणारे खूप कमी लोक आहेत आणि तेही आलिशान घर ही वेगळी बाब आहे. क्षणार्धात 20 कोटींचे घर मिळालेल्या या जोडप्याच्या नशिबावर विश्वास ठेवावा लागेल.
1000 रुपयांमध्ये 20 कोटी रुपयांचे घर मिळेल, असा विचारही त्यांनी केला नव्हता. त्यांनी नुकतेच एक हजार रुपयांच्या लकी ड्रॉसाठी (Lucky Draw) नोंदणी केली होती आणि नशिबाने त्यांना साथ दिली.
मिडलँडमध्ये राहणाऱ्या या जोडप्याला हा आलिशान बंगला केवळ कमी किमतीतच मिळाला नाही तर त्याला सुसज्ज करण्यासाठी पैसेही मिळाले.
कपल आता हे घर 26 कोटींना विकणार आहे
मात्र, आता घर मालक असलेल्या या जोडप्याने ते विकण्याचा विचार केला आहे. त्यांना हे घर एक वर्षापूर्वी लकी ड्रॉमध्ये फक्त 1000 रुपयांना मिळाले होते, तेव्हा त्याची किंमत 20 कोटी रुपये होती पण आता ते हे घर 26 कोटी रुपयांना विकत आहेत. या जोडप्याच्या या अनोख्या गुंतवणुकीबद्दल ऐकलेले प्रत्येकजण थक्क झाला. या जोडप्याने सांगितले की, त्यांच्यासाठी हे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे, ज्याचा त्यांनी कधी विचार केला नव्हता. सध्या हे घर पाहण्यासाठी अनेक लोक येत आहेत, मात्र अद्याप सौदा झालेला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

