'सर्वात धोकादायक ट्रेन' मध्ये जोडप्याने साजरा केला हनिमून, शेअर केले फोटो

या जोडप्याने जगातील सर्वात धोकादायक ट्रेनमधून प्रवास केला.
Couples
Couples Dainik Gomantak
Published on
Updated on

एका जोडप्याने त्यांच्या हनिमूनचे धक्कादायक फोटो शेअर केले आहेत. हे जोडपे 'जगातील सर्वात धोकादायक ट्रेन'मधून प्रवास करताना दिसत आहेत. ट्रेन सहारा वाळवंटातून जात आहे. या रेल्वे मार्गातील परिस्थिती खूपच विचित्र असून तापमानातही मोठा फरक आहे. हे जोडपे क्रोएशियाचे आहे. क्रिस्टिजन एलिस, वय वर्ष 35, आणि आंद्रिया ट्रोगोचेविच, वय वर्ष 29 आहेत. वास्तविक, या जोडप्याने आफ्रिकन देश (African Countries) असणाऱ्या मॉरिटानियामध्ये एका अनोख्या प्रकारचा हनीमून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, या जोडप्याने (Couples) जगातील सर्वात धोकादायक ट्रेनमधून प्रवास केला. ही ट्रेन (ट्रेन डु डेझर्ट) 2 किलोमीटर लांब होती. ट्रेनला (Train) संपूर्ण प्रवास करण्यासाठी 20 तास लागतात, ही ट्रेन अत्यंत कठीण परिस्थितीतून जाते. सुरक्षिततेच्या धोक्यामुळे तिला सर्वात धोकादायक ट्रेन म्हटले जाते.

Couples
अमेरिकेत महिलांनी का केले सेक्स स्ट्राइक!, 'गर्भपाताचा अधिकार मिळाल्यानंतरच...'

वास्तविक, हा फोटो क्रिस्टिजन इलिसच्या मित्राने क्लिक केला आहे. या जोडप्याने त्यांचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत, ज्यामध्ये ते ट्रेनच्या वर दिसत आहेत.

तसेच, या जोडप्याच्या फोटोंवर शेकडो युजर्स कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'हा हनिमूनचा आतापर्यंतचा सर्वोत्तम फोटो आहे…' तर दुसऱ्या एका व्यक्तीने हे फोटो पाहिल्यानंतर सांगितले की, 'या भावना शब्दात व्यक्त करता येणार नाहीत…'

Couples
US Abortion Law: अमेरिकेत गर्भपाताचा कायदेशीर अधिकार रद्द, नागरिक संतप्त

दिवस आणि रात्रीच्या तापमानात मोठा फरक

विशेष म्हणजे सहारा वाळवंटात दिवसाचे तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचते. त्याच वेळी रात्रीचे तापमान शून्य अंशांच्या खाली येते. अशा परिस्थितीत या जोडप्याने त्यांच्या हनीमूनसाठी अत्यंत अवघड जागा निवडली.

150 हून अधिक देशांना भेट दिली

क्रिस्टिजन एलिसने 150 हून अधिक देशांचा प्रवास केला आहे. क्रिस्टिजने सांगितले की, 'मी वेगळ्या प्रकारच्या सहलीचा विचार करत होतो, शेवटी मॉरिटानियाची निवड केली. वास्तविक, प्रवासाच्या बाबतीत लोक या ठिकाणाला कमी लेखतात.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com