अमेरिकेत महिलांनी का केले सेक्स स्ट्राइक!, 'गर्भपाताचा अधिकार मिळाल्यानंतरच...'

अमेरिकन स्त्रिया पुरुषांसोबत सेक्स न करण्याची धमकी देत ​​आहेत.
Women in America
Women in AmericaDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकन स्त्रिया पुरुषांसोबत सेक्स न करण्याची धमकी देत ​​आहेत. त्या 'सेक्स स्ट्राइक' बद्दल बोलत आहेत. वास्तविक, अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या गर्भपाताच्या निर्णयाला विरोध होत आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे महिलांचा गर्भपाताचा अधिकार संपुष्टात आला आहे. दुसरीकडे, 26 राज्यांना गर्भपातावर बंदी घालण्याची परवानगी मिळाली आहे. (american women threatening sex strike abortion rights supreme court decision)

दरम्यान, गर्भपाताचा अधिकार हा फेडरल कायदा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणार नसल्याचे महिलांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर देशभरात सेक्स स्ट्राइकची मागणी जोर धरु लागली आहे. एका ट्विटर युजरने लिहिले की, "अमेरिकेच्या महिलांनो, ही शपथ घ्या, कारण आपण अनपेक्षितरित्या गर्भधारणा करु शकत नाही. म्हणूनच आपल्याला कोणत्याही पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवायचे नाहीत."

Women in America
अमेरिका गोळीबार आणि नरसंहार रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलणार

#SexStrike आणि #abstinence हा ट्रेंडिंग आहे

आणखी एका युजरने सांगितले की, "मी न्यूयॉर्कमध्ये (New York) राहते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे. मी अशा लोकांचा शोध घेत आहे जे सेक्स स्ट्राइकचे समर्थन करत आहेत. हीच आमची ताकद आहे. जोपर्यंत गर्भपाताचा अधिकार फेडरल कायदा होत नाही तोपर्यंत सेक्स करु नका." #SexStrike सोबत #abstinence देखील ट्विटरवर ट्रेंड करत आहे. "जोपर्यंत महिलांना गर्भपाताचा अधिकार मिळत नाही, तोपर्यंत त्यांनी पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवू नयेत," असे म्हणत आणखी एका महिलेने (Women) देशव्यापी सेक्स स्ट्राइकची मागणी केली आहे.

एससीच्या निर्णयाविरोधात महिला रस्त्यावर उतरल्या

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयाविरोधात लोकही रस्त्यावर उतरल्याची माहिती आहे. अ‍ॅरिझोना कॅपिटलच्या बाहेरील आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी (Police) अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com