रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) मागिल गेल्या 25 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये आज चर्चेची पाचवी फेरी होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. 25 दिवसांच्या युद्धात रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेच्या चार फेऱ्या झाल्या आहेत. पण या आधीच्या चर्चेतून विशेष काही निष्पन्न झाले नाही. आणि आता उद्या चर्चेची पाचवी फेरी होणार आहे. सोमवारी, रशिया आणि युक्रेनचे प्रतिनिधी चर्चेची पाचवी फेरी आयोजित करणार आहेत. याआधी दोन्ही देशांदरम्यान तुर्कस्तानमध्ये परराष्ट्रमंत्र्यांच्या पातळीवर चर्चा झाली आहे, मात्र युद्धबंदीबाबत ठोस तोडगा निघू शकलेला नाहीये. चर्चेच्या पाचव्या फेरीत दोन्ही देश किती प्रगती करू शकतात हे ही पाहणे महत्वाचे असणार आहे. युद्धबंदीबाबत दोन्ही पक्षांमध्ये काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. (The fifth round of talks will be held in Ukraine and Russia)
दुसरीकडे, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाने सांगितले की या युद्धात किमान 902 नागरिक मारले गेले आहेत आणि 1459 जखमी झाले आहेत. मात्र, खरा आकडा यापेक्षा जास्तही असू शकतो, असे उच्चायुक्त कार्यालयाने म्हटले आहे. त्याच वेळी, मारियुपोलच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे की एकट्या मारियुपोल शहरात 2400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. नागरिक आणि सैनिकांच्या हत्येबाबत दोन्ही देश वेगवेगळे दावे करताना दिसत आहेत. (Russia Ukraine War news updates)
युद्धात रशियाचेही नुकसान, 14700 सैनिक मारले गेले
युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी असा दावा केला की 20 मार्चपर्यंत 14,700 रशियन सैनिक मारले गेले आहेत. याशिवाय मंत्रालयाने असे ही सांगितले की, या युद्धात आतापर्यंत रशियाची अनेक शस्त्रे नष्ट झाली आहेत. या युद्धात रशियाने 1487 चिलखती वाहने, 118 हेलिकॉप्टर, 96 विमाने आणि 476 रणगाड्यांसह अनेक शस्त्रे हरवल्याचा दावा मंत्रालयाने केला.
युक्रेन रशियाशी व्यवहार करण्यास तयार झाला: झेलेन्स्की
त्याच वेळी, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी रविवारी सांगितले आहे की युक्रेन रशियाशी करार करण्यास पुर्णपणे तयार आहे. झेलेन्स्की म्हणाले की, आम्ही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी चर्चेसाठी तयार आहोत. तसेच झेलेन्स्की पुढे म्हणाले की 'बोलण्याचा नकार हा WW3चा आहे'. रशिया युक्रेनवर सततचा आक्रमक आहे. रशियन सैन्य युक्रेनमधील निवासी भागांना सतत टारगेट करत आहेत. रशियन हल्ल्यामुळे युक्रेन जवळजवळ उद्ध्वस्तच झाले आहे. असे असूनही युक्रेनचे सैन्य रशियन सैनिकांना खंबीरपणे तोंड देताना दिसत आहे.
गेल्या आठवड्यात सुमारे 40 हजार लोकांनी मारियुपोल सोडले आहे,
रशियन सैन्याने वेढलेल्या युक्रेनच्या मारियुपोलच्या प्रशासनाचे असे म्हणणे आहे की, गेल्या आठवड्यात सुमारे 40,000 लोकांनी शहर सोडले, जे शहराच्या 430,000 लोकसंख्येच्या सुमारे 10 टक्के एवढे आहे.
सुमारे 1 कोटी लोकांनी देश सोडला: संयुक्त राष्ट्र
UNHCR प्रमुख फिलिपो ग्रँडी म्हणाले की युक्रेनमधील युद्ध इतके विनाशकारी आहे की, 10 दशलक्ष लोक एका देशामध्ये विस्थापित झाले आहेत किंवा परदेशात निर्वासित झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.