Mount Everest: ब्रिटीश गिर्यारोहकाचा मोठा चमत्कार! 19 व्यांदा सर केले जगातील सर्वात उंच शिखर; मोडले सगळे रेकॉर्ड

British Climber Everest 19 Times: रविवारी (18 मे) मोठा चमत्कार झाला. एका ब्रिटिश गिर्यारोहकाने 19व्यांदा माउंट एव्हरेस्ट सर केले. जगातील सर्वात उंच पर्वतावर सर्वाधिक वेळा चढाई करण्याचा स्वतःचा विक्रमही त्याने मोडला.
British Climber Everest 19 Times
British Climber Everest 19 TimesDainik Gomantak
Published on
Updated on

रविवारी (18 मे) मोठा चमत्कार झाला. एका ब्रिटिश गिर्यारोहकाने 19व्यांदा माउंट एव्हरेस्ट सर केले. जगातील सर्वात उंच पर्वतावर सर्वाधिक वेळा चढाई करण्याचा स्वतःचा विक्रमही त्याने मोडला. ब्रिटिश गिर्यारोहक हा एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या सर्वात यशस्वी गैर-शेर्पा गिर्यारोहकांपैकी एक आहे.

नेपाळच्या (Nepal) हिमालयन गाईड्स ईश्वरी पौडेल यांनी सांगितले की, नैऋत्य इंग्लंडमधील 51 वर्षीय केंटन कूल यांनी रविवारी इतर गिर्यारोहकांसोबत 8,849 मीटर उंचीचे शिखर सर केले. त्यांची प्रकृती ठीक असून ते शिखरावरुन खाली येत आहेत. 'हिमालयीन गाईड्स नेपाळ'ने त्यांच्या या मोहिमेसाठी आवश्यक ती संसाधने पुरवली.

British Climber Everest 19 Times
Action On China - Turkey: भारताचा चीन आणि तुर्कीवर डिजिटल स्ट्राईक; ग्लोबल टाईम्स अकाउंट बंद

कूल यांनी 2004 मध्ये पहिल्यांदा एव्हरेस्ट सर केले होते. तेव्हापासून ते जवळजळ दरवर्षी असा पराक्रम करुन सर्वांना चकीत करत आहेत. 2014 मध्ये 16 शेर्पा मार्गदर्शकांचा हिमस्खलनात मृत्यू झाल्यानंतर मोहीम रद्द करण्यात आल्याने ते त्यावेळी एव्हरेस्टवर चढू शकले नव्हते. 2015 मध्ये भूकंपामुळे हिमस्खलन झाले तेव्हाही 19 लोकांचा मृत्यू झाला होता. 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे मोहिम रद्द करण्यात आली होती.

British Climber Everest 19 Times
Regent International, China: जगातील सर्वात मोठी सोसायटी, इथे राहतात तब्बल 20 हजार कुटुंबे; आयुष्यभर...

तसेच, सध्या शेकडो गिर्यारोहक आणि त्यांचे मार्गदर्शक पर्वतावर आहेत, त्यापैकी बरेच जण आधीच यशस्वी झाले आहेत, तर या महिन्याच्या अखेरीस आणखी काहीजण यशस्वी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महिन्याच्या शेवटी पावसाळ्यात परिस्थिती बिकट होते, ज्यामुळे चढाई कठीण होते. कूल यांच्यापेक्षा केवळ नेपाळी शेर्पा मार्गदर्शकांनीच माऊंट एव्हरेस्टवर जास्त वेळा चढाई केली आहे. सर्वाधिक वेळा (30 वेळा) एव्हरेस्टवर चढाई करण्याचा विक्रम नेपाळी शेर्पा मार्गदर्शक कामी रीता यांच्या नावावर आहे. ते आताही शिखरावर असून पुढील काही दिवसांत ते चढाई पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com