'युद्ध', अल-अक्सा मशिदीत पॅलेस्टिनी अन् इस्रायली पोलिसांमध्ये चकमक

जेरुसलेममधील (Jerusalem) पवित्र अल-अक्सा मशिदीच्या परिसरात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे.
Al-Aqsa Mosque
Al-Aqsa Mosque Dainik Gomantak
Published on
Updated on

जेरुसलेममधील पवित्र अल-अक्सा मशिदीच्या परिसरात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. पॅलेस्टिनींनी इस्रायली पोलिसांवर दगडफेक केली, त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी गोळीबार केला. शुक्रवारी पहाटे झालेल्या हिंसाचारात 40 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Clashes between Palestinian and Israeli police at Al-Aqsa Mosque more than 40 injured)

Al-Aqsa Mosque
चीनची युक्ती फसली, पंतप्रधान हसीना यांनी भारताला देऊ केले चितगाव बंदर

इस्रायली पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मशिदीच्या आवारातील पॅलेस्टिनींनी पहाटेपासून दगडफेक करण्यास सुरुवात केली. पोलिस ज्या दिशेकडे उपस्थित होते, त्या दिशेने ही दगडफेक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी कंपाऊंडमध्ये घुसून रबरी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. एक तासानंतर हिंसा थांबली, जेव्हा इतर पॅलेस्टिनींनी कंपाऊंडमध्ये हस्तक्षेप केला.

दरम्यान, पॅलेस्टिनी रेड क्रेसेंट इमर्जन्सी सर्व्हिसने सांगितले की, या हिंसाचारात 40 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी 22 लोकांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आहे. हिंसाचार सुरु झाल्यानंतर इस्रायली पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी येणाऱ्या लोकांना कंपाऊंडमध्ये जाण्यापासून रोखले. यातच एका आरोग्य सेविकेलाही मारहाण करण्यात आली. दुसरीकडे, पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र हिंसाचारानंतर तीन जणांना अटक करण्यात आल्याचे निश्चितपणे सांगण्यात आले आहे. जेरुसलेमच्या या पवित्र ठिकाणी रमजान महिन्याच्या सुरुवातीपासूनच हिंसाचार उसळला. दगडफेक आणि गोळीबाराच्या फैरीही यावेळी पाहायला मिळाल्या.

Al-Aqsa Mosque
'भिकेचा कटोरा', पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचा 3.2 अब्ज डॉलर्सवर डोळा

इस्रायल-पॅलेस्टिनी वादाच्या केंद्रस्थानी अल-अक्सा मशीद कंपाउंड

अल-अक्सा मशिदीला इस्लाममधील तिसरे पवित्र स्थान मानले जाते. हे ज्यूंचे सर्वात पवित्र स्थान देखील आहे, ज्याला या समाजातील लोक 'टेम्पल माउंट' म्हणतात. अल-अक्सा मशीद दीर्घकाळापासून इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षाचे केंद्र राहीली आहे. इथे इस्त्रायली पोलिस आणि पॅलेस्टिनी लोकांमध्ये अनेक संघर्ष झाले आहेत. इस्रायली अधिकाऱ्यांनी गाझा पट्टीवर शासन करणाऱ्या हमास या गटावर हिंसाचार भडकावल्याचा आरोप केला आहे. या पवित्र ठिकाणी पोलीस तैनात असल्याचे पॅलेस्टिनींचे म्हणणे आहे. तसेच राष्ट्रवादी ज्यू इथे येत राहतात.

संघर्षामुळे 'युद्ध' चा धोका का निर्माण झाला?

वास्तविक, इस्रायल (Israel) आणि हमास यांच्यात अनेक दिवसांपासून तणाव सुरु आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात हमासने इस्रायलला जेरुसलेममधील अल-अक्सा मशीद आणि शेख जर्राह परिसरातून पोलिस मागे घेण्यास सांगितले होते. शेख जर्राहमध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी कुटुंबांना बाहेर काढण्याची भीती होती. अशा स्थितीत हमास त्यांच्या मदतीसाठी इस्रायलला धमकावत होता. त्यावेळी त्या कुटुंबांना तिथून हटवण्यासाठी न्यायालयात सुनावणीही सुरु होती. त्याचबरोबर दुसरीकडे निदर्शनेही चालू होती. जेरुसलेममधील पॅलेस्टिनी लोकांवर इस्रायली पोलिसांनी केलेली कारवाई पाहता हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला. यानंतर 11 दिवस दोन्ही पक्षांमध्ये युद्ध चालले. या युद्धात 250 पॅलेस्टिनी आणि 13 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. अशा स्थितीत पुन्हा एकदा असेच वातावरण इथे निर्माण होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा युद्धाचा धोका निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com