Maldives Parliament: मालदीवची संसद बनली 'सर्कस', राष्ट्रपती मुइज्जू यांच्या खासदारांचा गदारोळ; व्हिडिओ व्हायरल!

Maldives Parliament: मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोइज्जू अध्यक्ष झाल्यापासून ते भारतविरोधी भूमिका घेत आहेत.
Maldives Parliament
Maldives ParliamentDainik Gomantak
Published on
Updated on

Maldives Parliament: मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोइज्जू अध्यक्ष झाल्यापासून ते भारतविरोधी भूमिका घेत आहेत. त्यांनी अशी अनेक पावले भारतविरोधी उचलली आहेत. यामध्ये अनेक दशकांपासून मालदीवमध्ये तैनात असलेल्या त्यांच्या देशातील भारतीय सैनिकांना भारतात परत पाठवण्याचा समावेश आहे. इतकंच नाही तर चीन दौऱ्यानंतर मोइज्जू यांनी एका चिनी गुप्तहेर जहाजालाही आपल्या देशात थांबण्याची परवानगी दिली.

दरम्यान, मालदीवच्या संसदेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोध पक्षातील खासदार एकमेकांना मारहाण करत आहेत. वास्तविक, रविवारी मालदीवच्या संसदेत मुइज्जू मंत्रिमंडळासाठी मतदान होणार होते. मात्र विरोधी पक्ष एमडीपीने चार मंत्र्यांची मान्यता रोखणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. याच्या निषेधार्थ मालदीवमधील सत्ताधारी पक्ष आक्रमक झाला. सत्ताधारी आघाडीच्या खासदारांनी सभागृहात विरोध करण्यास सुरुवात केली. सभागृहात त्यांची अल्प संख्या आहे.

Maldives Parliament
India Maldives: "भारत आमचा जुना मित्र," मालदीवच्या अध्यक्षांना त्यांच्याच देशात विरोधकांनी घेरले

आता तुमच्या मनात प्रश्न असेल की सभागृहात अल्पसंख्याक असूनही मुइज्जू अध्यक्ष कसे झाले? त्यामुळे मालदीवमधील लोकशाही प्रक्रिया भारतापेक्षा खूपच वेगळी आहे. आधी मालदीवची व्यवस्था समजून घेऊ आणि त्यानंतर कळेल मालदीवमध्ये सध्या काय चालले आहे? मालदीवच्या संसदेला 'पीपल्स मजलिस' म्हणतात. मालदीवमध्ये खासदार आणि राष्ट्रपतींची निवडणूक स्वतंत्रपणे घेतली जाते. गेल्या वर्षी मालदीवमध्ये राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक झाली. तर पीपल्स मजलिसच्या सदस्यांची निवडणूक 2019 मध्ये झाली होती.

अशा प्रकारे राष्ट्रपती निवडला जातो

मालदीवमध्ये जनता थेट राष्ट्राध्यक्षाची निवड करते. ज्या उमेदवाराला 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळतात तो राष्ट्रपती म्हणून निवडला जातो. मात्र, कुणालाही पन्नास टक्के मते मिळाली नाहीत, तर सर्वाधिक मते मिळवणाऱ्या दोन उमेदवारांमध्ये लढत असते. ज्याला सर्वाधिक मते मिळतात तो राष्ट्रपती म्हणून निवडला जातो. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत मोहम्मद मुइज्जू यांना 54 टक्के मते मिळाली होती. ते 2019 मध्ये खासदार निवडून आले होते. 17 मार्च 2024 रोजी पुन्हा एकदा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत निवडणुका होईपर्यंत विरोधी पक्षाकडे सभागृहात बहुमत आहे. ते मुइझू यांच्या रणणितीला ब्रेक लावू शकतात.

Maldives Parliament
Maldives चे पुन्हा भारतविरोधी पाऊल, चिनी हेरगिरी जहाजाला दिली देशात थांबण्याची परवानगी

मुइज्जू यांच्या आघाडीचे खासदार सभागृहात विरोध करत आहेत

मुइज्जू यांच्या आघाडीचे खासदार सभागृहात विरोध करत आहेत. संसद भवनाबाहेर सरकार समर्थकांची गर्दी जमली. 22 सदस्यीय मंत्रिमंडळाला मंजुरी देण्यासाठी दुपारी 1.30 वाजता संसदेत मतदान होणार होते. मुइज्जू यांच्या पक्षाचे खासदार सतत विरोध करत आहेत. सभागृहाच्या आतील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, खासदार थेट सभापतींच्या खुर्चीजवळ पोहोचलेले दिसत आहेत. मतदान होऊ नये म्हणून खासदार विरोध करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com