Clashes In Central Nigeria: नायजेरियात जातीय हिंसाचार, दोन गटांमध्ये तुफान राडा, 30 जणांचा मृत्यू

मध्य नायजेरियात मंगळवारी (16 मे) रोजी पशुपालक आणि शेतकरी यांच्यात तुफान राडा झाला. यामध्ये 30 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
Nigeria Clash
Nigeria ClashDainik Gomantak
Published on
Updated on

Clashes In Central Nigeria: मध्य नायजेरियात मंगळवारी (16 मे) रोजी पशुपालक आणि शेतकरी यांच्यात तुफान राडा झाला. यामध्ये 30 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. एका स्थानिक अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

नायजेरियात, बहुतेक मुस्लिम उत्तर भागात राहतात, तर ख्रिश्चन दक्षिण भागात राहतात. फाळणीवरून या दोन समाजात अनेकदा भांडणे होतात. येथील लोक वर्षानुवर्षे जातीय आणि धार्मिक हिंसाचाराचा सामना करत आहेत.

  • मंगू जिल्ह्यातील बावोई येथे हिंसाचार

मध्य नायजेरियाचे माहिती आणि संप्रेषण आयुक्त डॅन मांजांग यांनी एएफपीला सांगितले की 30 लोक ठार झाले आणि बरेच जण जखमी झाले आहे. ते म्हणाले की, मेंढपाळ आणि शेतकरी यांच्यात हाणामारी झाली. यामध्ये मेंढपाळ मुस्लिम तर शेतकरी ख्रिश्चन धर्माचे होते.

पोलिसांनी सांगितले की, मंगू जिल्ह्यातील बावोईच्या वेगवेगळ्या गावात हा हिंसाचार झाला. मध्य नायजेरिया पोलिसांचे प्रवक्ते अल्फ्रेड अलाबो यांनी सांगितले की, दिवसभरात अंदाजे 11:56 मिनिटांनी एक आपत्कालीन कॉल आला, ज्यामध्ये आम्हाला गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. 

Nigeria Clash
Mystery in Melbourne: 65 महिलांना पोस्टाने पाठवले वापरलेले कंडोम, मेलबर्नमधील घटनेने खळबळ
  • या हिंसाचारासाठी मेंढपाळांना जबाबदार धरण्यात आले

या घटनेनंतर परिसरात सुरक्षा अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. 24 तासांचा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हूडलम्स ही स्थानिक संज्ञा गुन्हेगारांसाठी वापरली जाते. उत्तर पश्चिम आणि मध्य नायजेरियामध्ये हत्या, सामूहिक अपहरण आणि लूटमारीच्या घटना वारंवार घडतात.

येथे अवजड शस्त्रास्त्रांनी सज्ज टोळ्या अनेकदा गावे लुटण्याचे काम करतात. या वर्षी एप्रिलमध्ये, शेजारच्या बेन्यू राज्यातील एका गावात बंदुकधारींनी केलेल्या हल्ल्यात सुमारे 50 लोक ठार झाले होते. स्थानिक अधिकाऱ्यांनी या हिंसाचारामागे गुरेढोरे, ज्यांच्यावर शेतकऱ्यांनी त्यांची गुरेढोरे अनेकदा त्यांच्या शेताची नासधूस केल्याचा आरोप लावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com