Mystery in Melbourne: 65 महिलांना पोस्टाने पाठवले वापरलेले कंडोम, मेलबर्नमधील घटनेने खळबळ

पोस्टातून आलेल्या या कंडोमसोबत एक हस्तलिखित पत्र देखील पाठवले असल्याने या घचनेचा पेच वाढला आहे.
Melbourne
MelbourneDainik Gomantak

Mystery in Melbourne: ऑस्ट्रेलिया मधून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. मेलबर्नमधील तब्बल 65 महिलांना पोस्टाद्वारे वापरलेले कंडोम मिळाले आहेत.

यापूर्वी मार्चमध्ये अशीच घटना समोर आली होती, त्यानंतर सोमवारी पुन्हा हा प्रकार समोर आल्याने या घटनेचे गूढ कायम आहे.

(65 women received used condoms in the post in Melbourne)

बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मेलबर्नमध्ये 65 महिलांना पोस्टाद्वारे वापरलेले कंडोम मिळाल्यानंतर पोस्टमध्ये पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

पोस्टातून आलेल्या या कंडोमसोबत एक हस्तलिखित पत्र देखील पाठवले असल्याने या घचनेचा पेच वाढला आहे. पोलिसांनी या घटनेमागे कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, घटनाक्रम आणि पत्राद्वारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

विशेष म्हणजे ज्या महिलांसोबत ही घटना घडली आहे त्या सर्व महिलांनी 1999 मध्ये शहरातील किलब्रेडा कॉलेज खासगी मुलींच्या शाळेत शिक्षण घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मेलबर्नच्या हेराल्ड सन वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, महिलांच्या घरचा पत्ता संशयितांना शाळेच्या जुन्या वार्षिक पुस्तकातून मिळाला असा संशय व्यक्त केला जात आहे. पोस्टात हस्तलिखित संदेश असल्याने या घटनेचे गूढ वाढले आहे.

अनेक महिलांना वापरलेल्या कंडोमसह बंद पाकिटात एकापेक्षा जास्त पत्रे मिळाली आहेत. असे ऑस्ट्रेलियन पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणाबाबत कोणाला माहिती द्यायची असेल तर त्यांनी द्यावी असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, या विचित्र घटनेमुळे ऑस्ट्रेलियात सध्या खळबळ निर्माण झाली असून, पोलिस घटनेचे गूढ उलघडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com