चीन वाढवतोय अणुम्बॉबचा साठा, ड्रॅगनची लढाईची तयारी?

एक वर्षापूर्वी, पेंटागॉनने चीनच्या अण्वस्त्रसाठ्याची संख्या 200 च्या आसपास ठेवली होती, जी दशकाच्या अखेरीस दुप्पट किंवा 400 होण्याचा अंदाज होता.
China plan to increase their Atomic power
China plan to increase their Atomic power Dainik Gomantak
Published on
Updated on

चीन (China) आपल्या अण्वस्त्रांचा ( Atomic bomb) साठा अपेक्षेपेक्षा अधिकच वेगाने वाढवत आहे. चीनने आपली अण्वस्त्रे अमेरिकेच्या (USA) अधिकाऱ्यांनी वर्षभरापूर्वी वर्तवली होती त्यापेक्षा जास्त वेगाने बनवली आहेत. अमेरिकेची बरोबरी करण्यासाठी चीन हे करत असल्याचे मत तद्यांनी व्यक्त केले आहे . तसे, या शतकाच्या मध्यापर्यंत अमेरिकेला मागे टाकण्याची चीनची योजना आहे.(China plan to increase their Atomic power)

2030 पर्यंत 1,000 अणुबॉम्ब बनवण्याचा अंदाज आहे

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या पेंटागॉनच्या अहवालात म्हटले आहे की चीन सहा वर्षांत 700 अण्वस्त्रे तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे. या अहवालानुसार 2030 पर्यंत चीन आपल्या अण्वस्त्रांची संख्या 1000 पर्यंत वाढवू शकतो. एक वर्षापूर्वी, पेंटागॉनने चीनच्या अण्वस्त्रसाठ्याची संख्या 200 च्या आसपास ठेवली होती, जी दशकाच्या अखेरीस दुप्पट किंवा 400 होण्याचा अंदाज होता.

अमेरिकेकडे सध्या 3,750 अण्वस्त्रे आहेत आणि ती संख्या वाढवण्याचा त्यांचा सध्या इरादा नाही. तर 2003 मध्ये अमेरिकेकडे 10,000 अण्वस्त्रे होती. नंतरचे करार आणि इतर कारणांमुळे अमेरिकेच्या अण्वस्त्रांची संख्या कमी झाली. आता चीनची योजना पाहता, भविष्यात अण्वस्त्रांचा साठा वाढवायचा की नाही हे बायडेन प्रशासनाला ठरवायचे आहे.

परंतु चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेण्याची शिफारस करते. हे आवश्यक आहे कारण तैवानच्या मुद्द्यावर अमेरिकेला चीनशी समोरासमोर जावे लागू शकते.त्यामुळेच चीन सध्या तयारी करत आहे. या अहवालानुसार, चीन भविष्यात युद्ध लढण्याची आणि जिंकण्याची तयारी करत आहे. त्याचा अंतिम संभाव्य प्रतिस्पर्धी अमेरिका आहे. त्यामुळे चीनची विचारसरणी लक्षात घेऊन अमेरिकेला आपली तयारी करावी लागणार आहे.

China plan to increase their Atomic power
चीनी राष्ट्राध्यक्षांच्या डोक्यात नेमके शिजतेय तरी काय?

चीनची तैवानमध्ये घुसखोरी

तर दुसरीकडे चीन आणि तैवान यांच्यातील तणाव काही काळापासून वाढला आहे. चीन सातत्याने विक्रमी लढाऊ विमाने पाठवून तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी करत आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही तैवानचा शांततेने चीनमध्ये समावेश केला जाईल, असे सांगितले. तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी त्यांच्या विधानाला उत्तर देताना म्हटले की, चीन आपले भवितव्य ठरवू शकत नाही. चीनने हल्ला केला तर ती अत्यंत भयावह घटना असेल, असा इशारा त्यांनी दिला. या भाषणबाजीनंतर चीन तैवानवर हल्ला करू शकतो, अशी भीती वाढली आहे. मात्र, चीन प्रत्यक्षात काय करणार याबाबत काहीही सांगता येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com