China: 'अमेरिका आमचं काहीही बिघडवू शकत नाही...'- चीनचे मोठं वक्तव्य

China: चीन रशियाबरोबर आपले संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे.
China Foreign Minister
China Foreign MinisterDainik Gomantak
Published on
Updated on

China: चीनचे परराष्ट्रमंत्री किन गांग यांनी अमेरिका आणि रशियाबरोबरच्या संबंधाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. चीन आणि अमेरिका हे दोन्ही देश सतत एकमेकांवर टीका करताना दिसतात.

आता चीनचे परराष्ट्रमंत्री किन गांग यांनी चीनवर दबाव टाकण्याच्या प्रयत्नात अमेरिका कधीही यशस्वी होऊ शकत नाही असे म्हटले आहे.

चीन नेहमीच आपल्या मूळ हितांचे संरक्षण करण्यास तयार राहिल असे म्हटले आहे. त्याचबरोबर चीन रशियाबरोबर आपले संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

चीन आणि रशिया आंतराष्ट्रीय संबंधाचे उत्तम उदाहरण म्हणून समोर येत असेही चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे. या दोन देशांच्या संबंधाला इतर कोणत्याही राष्ट्राने शीतयुद्धाचे नाव देऊ नये.

चीन-रशियाच्या या संबंधाला गटातटाच्या राजकारणापासून, कोणत्याही वादापासून वेगळे पाहावे असे चीनचे परराष्ट्रमंत्री किन गांग यांनी म्हटले आहे.

China Foreign Minister
International Women's Day: जागतिक महिला दिनानिमित्त गूगलचं खास डूडल, पाहा एका क्लिकवर

चीनने व्यापारासाठी अमेरिकेचा डॉलर आणि युरोच्या वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. चलनाचा वापर इतर देशांविरुद्ध शस्त्र म्हणून करु नये. चीन असे चलन वापरात आणेल जे विश्वसनिय आणि सुरक्षित असेल.

रशिया-युक्रेन युद्धाबाबत बोलताना किन गांग यांनी म्हटले आहे की, युक्रेनवरचे हे संकट युरोपिय सुरक्षा प्रणालीत असलेली कमतरता आहे.

दरम्यान, चीन( China )-अमेरिका या दोन्ही देशात चीनच्या बलूनवरुन मोठे आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता चीनच्या परराष्ट्रमंत्र्यानी केलेल्या या वक्तव्यावर अमेरिका( USA ) काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com