International Women's Day 2023
International Women's Day 2023Dainik Gomantak

International Women's Day: जागतिक महिला दिनानिमित्त गूगलचं खास डूडल, पाहा एका क्लिकवर

गूगलने बनवलेल्या या खास डूडलबद्दल जाणून घेउया
Published on

International Women's Day: दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. गुगल (Google) जगातील सर्वात मोठं प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाते. गुगलचे (Google Doodle) विविध डिझाइन्सचे डूडल अनेकांचे लक्ष वेधतात.

आज 'जागतिक महिला दिन' (International Women's Day) निमित्त गुगलने एक खास डूडल तयार केले आहे. या डूडलमध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. तुम्ही आजचे डुडल पाहिले नसेल तर नक्की पाहा.

  • विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव

'जागतिक महिला दिन' हा दिवस जागतिक स्तरावर दरवर्षी 8 मार्च रोजी महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. यानिमित्ताने गुगलकडून खास डूडल तयार केले आहे.

या डूडलमध्ये एक महिला भाषण करताना दिसत आहे तर काही महिला या आंदोलनात सहभागी झालेल्या दिसत आहे. ग्रह, ताऱ्यांचे निरिक्षण करणाऱ्या महिला (Women) देखील या डूडलमध्ये दिसत आहेत.

ज्येष्ठ महिला तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी महिला देखील या डूडलमध्ये दिसत आहे. या डूडलवर क्लिक केल्यानंतर स्क्रिनवर महिलांचे हात दिसतील. या हतात निळ्या आणि जांभळ्या रंगाचे झेंडे दिसतात. 

  • गुगल डूडल आर्टिस्टनं व्यक्त केल्या भावना

जागतिक महिला दिनाचं हे गूगल डूडल आर्टिस्ट, अॅलिसा विनान्सद्वारे (Alyssa Winans) डिझाइन करण्यात आले आहे. अॅलिसा विनान्सनं या डूडलबद्दलची भावना देखील व्यक्त केली.

तिने यंदाच्या जागतिक महिला दिनाच्या डूडलबाबत सांगितलं की, आमची यावर्षीची डूडलची थिम ही 'वुमन सपोर्टिंग वुमन' ही आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com