Chinese Fishing Boat Capsizes: हिंदी महासागरात चिनी बोट बुडाली, 39 जण बेपत्ता, बचावकार्य सुरू

जहाजात 17 चिनी क्रू मेंबर्स, 17 इंडोनेशियन क्रू मेंबर्स आणि 5 फिलिपिनो क्रू मेंबर्स असे एकूण 39 लोक होते.
Chinese Boat Capsizes
Chinese Boat CapsizesDainik Gomantak

Chinese Fishing Boat Capsizes in Indian Ocean: चिनी मासेमारी जहाज लू पेंग युआन यू 028 हे हिंद महासागरात बुडाले आहे. मंगळवारी (16 मे) स्थानिक वेळेनुसार तीनच्या सुमारास ही घटना घडली.

घटनेच्या वेळी जहाजात 17 चिनी क्रू मेंबर्स, 17 इंडोनेशियन क्रू मेंबर्स आणि 5 फिलिपिनो क्रू मेंबर्स असे एकूण 39 लोक होते.

बोटमध्ये असणारे सर्व 39 लोक बेपत्ता असून, सध्या बचावकार्य सुरू आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्याचे आवाहन केले आहे.

राष्ट्राध्यक्षाच्याकडून चिनी कृषी आणि ग्रामीण व्यवहार मंत्रालय, वाहतूक मंत्रालय आणि शेडोंग प्रांतीय सरकारला सर्व परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी, बचाव कर्मचार्‍यांची संख्या वाढवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय शोध आणि बचाव प्रयत्नांमध्ये समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याशिवाय, चिनी परराष्ट्र मंत्रालय आणि परदेशातील संबंधित दूतावासांनाही स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून शोध आणि बचाव मोहिमेत मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Chinese Boat Capsizes
Melbourne: 65 महिलांना पोस्टाने पाठवले वापरलेले कंडोम, मेलबर्नमधील घटनेने खळबळ

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान ली केकियांग यांनी लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सूचना जारी करण्याची घोषणा केलीय.

जहाज बुडाले त्या भागात सरकारने इतर बचाव दलही पाठवले आहे. चिनी सागरी शोध आणि बचाव केंद्राने संबंधित देशांना माहिती दिली आहे.

याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांचे बचाव पथकही बेपत्ता लोकांच्या शोधात मदत करत आहेत.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया आणि फिलीपिन्समधील संबंधित दूतावासांशी समन्वय साधण्यासाठी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा देखील सुरू केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com